विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
दि.30 सप्टेंबर 2025रोजी श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर
येथे नवरात्र उत्सवा प्रित्यर्थ विद्यार्थिनी कल्याण मंडळातर्फे विद्यार्थिनी करीता "स्व संरक्षण गरज आणि तंत्र" या विषयावर सौ.मनीषा मुकुंद ताम्हाणे.. टी. एम.सी.शाखा पुणे..ग्रामीण जुन्नर सेशन कोर्ट पैरवी अधिकारी..यांचे विशेष मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केलेले होते.सदर कार्यक्रमासाठी ज्युनिअर कॉलेज समन्वयक प्रा. पी.एस.लोढा कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित होत्या तसेच पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते उपस्थित होते.या कार्यक्रमामध्ये सौ.ताम्हाणे यांनी मुलींना महिलांचे कायदेविषयक हक्क व महिला सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त माहिती दिली.
नवरात्री निमित्ताने नारीशक्ती विषयी जागृत केले व स्त्री सक्षमीकरणाची आवश्यकता विशद केली. समाजाप्रती असलेल्या उत्तरदायीत्वाची जाणीव करून दिली असे विद्यार्थीनी कल्याण मंडळाच्या चेअरमन प्रा.व्ही.एच.सावंत यांनी माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एम वाघमारे होते.संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊन विद्यार्थिनींचे कौतुक केले.पाहुण्यांची ओळख प्रा.एस.के.कोकणे यांनी करून दिली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.तेजस्वी बेळे हिने तर आभार सौ.एस.वाय.यादव यांनी केले.

