विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगर,ग्राहक कल्याण फाऊंडेशन जुन्नर तालुका,ग्रामोन्नती मंडळ नारायणगाव यांच्या वतीने सरिता म्हेत्रे कलढोणे यांना साहित्यिक वाटचालीसाठी नुकताच ग.ह.पाटील स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.नारायणगाव येथे
श्रीमान म.व.भुजबळ कृषी शिक्षण संकुल येथे
काव्य मैफिल व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध साहित्यिक डॉ संजय बोरुडे,प्रसिद्ध कवयित्री रचना मॅडम,कविता जगणारे कवी सुनील उबाळे यांच्या हस्ते देण्यात हा पुरस्कार देण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा राजगुरुनगरचे अध्यक्ष संतोष गाढवे यांनी केले.
सरिता म्हेत्रे कलढोणे ह्या जुन्नर येथील शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.त्यांच्या 'शब्दांच्या गाभाऱ्यात' या कवितासंग्रहाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यांना ग.ह.पाटील स्मृती पुरस्कारा प्रदान झाल्याबद्दल त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक क्षेत्रातून कौतुक होत आहे.
