विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचा समारोप समारंभ कार्यक्रम "विश्व हृदय दिनाचे" औचित्य साधत दि.२९ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडला.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी. कुलकर्णी यांनी दिली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीयस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी भूषविले.कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ.प्रिया कर्डीले यांनी “आयुष व अशक्तपणा-उत्तम आरोग्यासाठी मार्ग” या विषयावर मार्गदर्शन केले.आरोग्यदायी जीवनशैली,संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक तंदुरुस्ती यांचे महत्त्व स्पष्ट केले.प्रमुख पाहुणे डॉ. कॅप्टन बाबासाहेब माने व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सतीश जाधव उपस्थित होते. कॅप्टन माने यांनी जीवन जगत असताना विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
समारोप कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी शुभेच्छा देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना समाजाभिमुख कार्य करण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.महेंद्र कोरडे यांनी केले तर आभार प्राध्यापिका जयश्री कणसे यांनी केले.या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ सुप्रिया काळे,प्रा.जयश्री कणसे,प्रा.विष्णू घोडे,प्रा मयूर चव्हाण यांनी केले.
