Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

"प्रशिक्षण व नोकरी कार्यशाळा" (ट्रेनिंग व जॉब ड्राईव्ह) कार्यक्रमाचे उदघाटन



विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर

श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर व रिलायन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 सप्टेंबर ते 06 ऑक्टोबर 2025 या कालावधीत महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण व नोकरी कार्यशाळा (ट्रेनिंग व जॉब ड्राईव्ह) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी आयक्यूएसी समन्वयक डॉ.विनायक लोखंडे व रिलायन्स फाउंडेशन पुणे या संस्थेचे प्रशिक्षक सौ.कविता प्रसाद व श्री.मनीष भोसले उपस्थित होते. या कार्यशाळेसाठी एकूण 124 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली आहे.विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या कालावधीमध्ये 30 तासांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.



कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना रिलायन्स फाउंडेशन पुणे यांच्यावतीने सॉफ्ट स्किल, बायोडाटा तयार करणे,संभाषण कौशल्य व सायबर सुरक्षा अशा विविध प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकरी भरती प्रक्रिया (प्लेसमेंट ड्राईव्ह) राबविण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या माध्यमातून यशस्वीपणे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बँक, आयटी ऑफिस,फायनान्स व प्रोडक्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी प्राप्त होणार आहेत.विद्यार्थ्यांनी आपल्यामधील विविध कलागुण ओळखून त्यांना विकसित करून भविष्यातील संधीचा वेध घेतला पाहिजे,असा मोलाचा संदेश प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिला.कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अशोक दुशिंग प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख यांनी केले,तर सूत्रसंचालन प्रा.एस.के.बनकर यांनी केले व प्रा.एस.एस.थोरवे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी प्लेसमेंट विभागातील सदस्य प्रा.राहुल सहाणे,प्रा.कांचन वर्पे व प्रा.मयुरी कुंभोजे,तसेच श्री मितेश गाडेकर,श्री कुमार सूर्यवंशी,श्री. योगेश मस्करे,श्री.सिताराम शेळकंदे व श्री.एकनाथ घुटे यांचे सहकार्य लाभले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.