विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
खेड तालुका माध्यमिक मुख्याध्यापक -शिक्षक- शिक्षकेतर संघ यांच्या वतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मुख्याध्यापक,शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा गुणगौरव समारंभ रविवार दि. ७ सप्टेंबर रोजी राजगुरुनगर येथील रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी कुंडेश्वर विद्यालय पाईट येथील शिक्षक श्री.दिपक युवराज घोलप यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार पुणे विभागाचे शिक्षक आमदार श्री.जयंत असगावकर आणि पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री.भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. समारंभाला खेडचे आमदार श्री.बाबाजीशेठ काळे, माजी आमदार श्री.दिलीप मोहिते पाटील, प्राथमिक शिक्षण अधिकारी श्री.संजय नाईकडे ,खेड तालुका पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री.अमोल जंगले,आदिवासी शिक्षण संस्था जुन्नर या संस्थेच्या अध्यक्षा श्रीम.सुरेखाताई कृष्णराव मुंढे,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्री.अशोकदादा घोलप, पंचायत समितीचे माजी सदस्य श्री.रोहिदास गडदे, खेड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.उत्तमराव पोटवडे,कार्याध्यक्ष श्री.संजय बोरकर,सचिव श्री. रामदास रेटवडे,आणि खामगावचे माजी उपसरपंच श्री.गिरीधरकाका नेहरकर उपस्थित होते.
दिपक घोलप सर गेली ११ वर्षे आदिवासी शिक्षण संस्थेच्या जुन्नर तसेच खेड तालुक्यातील विविध ठिकाणी इंग्रजी विषयाचे अध्यापन करत आहेत. सध्या ते पाईट येथील कुंडेश्वर विदयालयामध्ये कार्यरत आहेत. इंग्रजी विषयबरोबर त्यांनी सामाजिक कार्यातही मोलाचे योगदान दिले आहे. सामाजिक कार्य,धार्मिक कार्य,आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आहे. त्यांनी सातत्याने विविध व्याख्यानमाला,इंग्रजी विषयाचे वर्षभर ज्यादा तास,दहावी इंग्रजी विषयाचा १००% निकाल व गरिब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे.असे समाज उपयोगी कार्यांची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्याबद्दल त्यांच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
