पुणे: आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक कृषीराज टकले राष्ट्रीय अध्यक्ष बी. एन.सागर काळे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल , आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कोकीळाताई पवार,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्रा. अनिल निघोट यांच्या शिफारशीनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मराठा सेवकांची विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.
गणेश तुळशीराम वाळुंज,
पुणे जिल्हा समन्वयक
पुणे जिल्हा समन्वयक पदावर सामाजिक धार्मिक व पत्रकारीता क्षेत्रात अग्रेसर असलेले , गणेश तुळशीराम वाळुंज कानसे, पुणे जिल्हा संघटक पदावर प्रसिद्ध बैलगाडा मालक शाहिर सतीश पोखरकर गंगेवाडी,युवा नेतृत्व विवेक पिंगळे नारोडी आंबेगाव तालुकाप्रमुख पदावर, आंबेगाव तालुका समन्वयक म्हणून प्रगतिशील शेतकरी शिवाजीराव सखाराम वाळुंज वाळुंजनगर-लोणी, तर आंबेगाव तालुका कार्याध्यक्ष म्हणून दिनेश खिरड वडगाव काशिंबेग आंबेगाव तालुका सरचिटणीस म्हणून गिरवली गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते राहुल गभाले यांची निवड करण्यात आली आहे.
शिवाजीराव सखाराम वाळुंज
आंबेगाव तालुका समन्वयक
सर्व नवनियुक्त पदाधिकारींचे स्वागत करुन, संघटनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी निवड केली जात असुन ऐतिहासिक आघाडीत मराठा सरदार घराण्यातील वारसांची पदाधिकारी म्हणून निवड होत असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा,भगव्या झेंड्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढाईत एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी पुणे जिल्हा, आंबेगाव तालुका व गावपातळीवर अध्यक्ष व ईतर पदाधिकारी नियुक्ती केली जाईल. मराठा समाजानेही आपल्या समस्यांबाबत 9422463300 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करत तालुक्यात प्रथम मोठ्या गावात शाखा -कार्यालय सुरू करुन मराठा समाजाच्या अडचणी सोडवत, मराठा तरुण तरुणींना भविष्यविषयक मार्गदर्शन ,सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सर्वांचे साथीने केला जाणार असून कोणतेही राजकारण न आणता आपल्या मराठा समाजाच्या हितासाठी,भावी पिढीच्या विकासासाठी एकत्र येत मराठी संस्कृती जोपासण्यासाठी सदैव कार्यरत रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट यांनी केले.
राहुल सावकार गभाले
आंबेगाव तालुका सरचिटणीस



