प्रतिनिधी जुन्नर | प्रा. प्रविण ताजणे सर
१८ ऑगस्ट २०२५ रोजी जुन्नर येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात डिसेंट फाउंडेशन पुणे ,मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष ,पंचायत समिती आरोग्य विभाग जुन्नर आणि श्री बालाजी फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील सर्व आशा सेविकांसाठी मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी जुन्नर तालुक्यातील ३४२ आशा सेविकांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या .विशेषतः स्तनाचा कॅन्सर ,गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर ,हृदयरोग,मूत्ररोग,हाडांचे आजार,स्त्रीरोग ,नेत्र तपासणी ,दंतरोग, आयुवेद उपचार ,ई सि जी, कॅन्सर मार्कर ,बी पी,शुगर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या .
या तपासण्या झाल्यानंतर ज्यांना ऑपरेशन किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास त्या शस्त्रक्रिया योजनेमध्ये मोफत केल्या जाणार असल्याचे डॉ मानसिंग साबळे यांनी सांगितले.
ज्या आशा सेविला वाडी वस्तीवर जाऊन शासनाच्या आरोग्यविषयक योजना जनसामान्यनपर्यंत पोहोचवतात व लोकांच्या आरोग्याची काळजी घेतात म्हणून खासकरून त्या आशासेविकांसाठी हे आरोग्य शिबीर आयोजित केल्याचे जितेंद्र बिडवई म्हणाले.
या शिबिरासाठी श्री हॉस्पिटल आळेफाटा, डोके हॉस्पिटल नारायणगाव ,आळेफाटा हॉस्पिटल ,विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नारायणगाव, शंकरा आय हॉस्पिटल पनवेल,डी.वाय. पाटील आयुर्वेद कॉलेज पुणे ,डी.वाय.पाटील दंत महाविद्यालय पुणे ,इंटींग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली, श्रीकृष्ण दातांचा दवाखाना जुन्नर ,माऊली आय केअर जुन्नर व हिंद लॅब जुन्नर यांनी सहकार्य केले
या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे अध्यक्ष डॉ मानसिंग साबळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डिसेंट फाउंडेशचे संस्थालक जितेंद्र बिडवई होते. तसेच प्रमुख उपस्तितीमध्ये महाराष्ट्र राज्य रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी कुळमेथे ,लायन्स क्लब चे अध्यक्ष मछिंद्र मुंडलिक ,पोलीस अधिकारी मनिषा ताम्हाणे ,डॉ.अमेय डोके ,डॉ.आशुतोष बोळीज,डॉ.प्रसाद शिंगोटे, डॉ.ज्ञानेश्वर गायकवाड,आदिनाथ चव्हाण ,प्रा.एकनाथ डोंगरे,प्रकाश पाटील,बाळासाहेब खिलारी,डी.बी.वाळुंज ,दीपक वारुळे,दीपक कोकणे,जयवंत डोके,प्रशांत केदारी , डॉक्टर्स ,तपासणी तज्ञ व आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्तित होते .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनीता वामन यांनी केले प्रास्ताविक डॉ.दयानंद गायकवाड यांनी केले तर आभार डिसेंट फाउंडेशचे सचिव डॉ.एफ.बी.आतार यांनी मानले.



