जुन्नर | जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात मागील काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर काल दिवसभरापासून जोरदार हजेरी लावली.
ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या भात शेती पिकांची काळजी होती कारण भात पीके अक्षरशः जळून जाण्याच्या बेतात होती मात्र आता शेतकऱ्यांची चिंता मिटली, त्यामुळे शेतकरी देखील सुखावला.
एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे पावसाने मात्र धुमाकूळ घातला असून सोयाबीन, भुईमूग व इतर पिकांची पावसाने दैना करून टाकली दोन दिवसापासून या पावसामुळे ओढे नदी व नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत देखील झाले आहे, रात्रभर पाऊस असल्याने घरातील वीज देखील गायब आहे, मात्र या पावसामुळे नुकसान देखील मोठ्या प्रमाणात झाले आहे.
काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्यामुळे शेताचे बांध यामुळे फुटून मोठे नुकसान झाले आहे, अचानक आलेल्या अवकाळी पावसाने मात्र काही भागात अक्षरशः लोकांची झोप उडवली आहे.
