विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभाग व गुणवत्ता सुधार योजना IQAC अंतर्गत “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) व अर्थशास्त्र विषयासमोरील संधी व आव्हाने” या विषयावर संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड संजय शिवाजीराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि.19 ऑगस्ट 2025 रोजी महाविद्यालयात एकदिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.कार्यशाळेस उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अर्थशास्त्र प्राध्यापक वर्गाचा उंदड प्रतिसाद मिळाल्याची माहिती अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी दिली.
अर्थशास्त्र विषयाच्या कार्यशाळे प्रसंगी धनक्रांती अकॅडमी पुणे येथील संचालक प्रा.राम वाव्हळ यांनी शेअर मार्केट चे महत्व व त्यासंबंधी अभ्यासक्रम या विषयावर तसेच संगमनेर महाविद्यालयाचे व पुणे विद्यापीठ अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य प्रो.डॉ.गोरक्षनाथ सानप यांनी एनईपी व अर्थशास्त्र विषयासमोरील संधी, नारायणगाव महाविद्यालयातील, पुणे विद्यापीठातील बँकिंग अभ्यास मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.श्रीकांत फुलसुंदर यांनी एन ए पी व अर्थशास्त्र विषयासमोरील आव्हाने या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे उद्घाटन संस्थेचे विश्वस्त मा.ॲड अविनाश थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना अशा कार्यशाळेतून विषयाच्या बाबतीतील उपयुक्तता लक्षात घेण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे होते. त्यांनी बोलताना शेअर मार्केट असा गहन विषय अभ्यासताना संपत्ती प्राप्त करताना सकारात्मक व नैतिक दृष्टिकोन ठेवून तो प्राप्त करण्याचे विद्यार्थ्यांना सुचित केले. अशा कार्यशाळेतून तसेच अभ्यासक्रमातून ते प्राप्त होते असेही स्पष्ट केले.
या कार्यशाळे प्रसंगी प्रा.राम वाव्हळ यांनी शेअर्स मार्केटचे महत्त्व स्पष्ट करताना विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच शेअर्स मार्केटचे ज्ञान संपादित करून आपण स्वतःच उत्पन्न प्राप्त करण्यासंबंधी आपल्या पीपीटी प्रेझेंटेशन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी,कोणत्या पद्धतीने करावी,कोणते शेअर्स निवडावेत अशा विविध बाबींवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.डॉ.सानप यांनी आपल्या मनोगतातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व अर्थशास्त्र विषयासंबंधी अनेक संधी विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणातून प्राप्त होऊ शकतात याविषयी अनेक दाखले देत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपण योग्य प्रकारे शिक्षण संपादन केल्यास विषयाच्या अनुषंगाने शिक्षणाच्या व नौकरीच्या परदेशात सुद्धा संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन केले.डॉ.फुलसुंदर यांनी आपल्या मनोगतातूनअर्थशास्त्र विषया समोरील आव्हाने याबाबतीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यशाळेच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उत्तर पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक वृंद, महाविद्यालयातील कला विभाग प्रमुख डॉ.अभिजीत पाटील,वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सतीश जाधव तसेच इतर प्राध्यापक वृंद बहुसंख्येने उपस्थित होते.कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ओतूर महाविद्यालयातील डॉ.रमेश काशीदे,चाकण महाविद्यालयातील डॉ उमेश भोकसे,आळे महाविद्यालयातील डॉॅ.दत्तात्रय चव्हाण, बोरी बु.॥ महाविद्यालयातील प्रा.गणेश शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी नारायणगाव महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग व संशोधन केंद्रप्रमुख प्रा आकाश कांबळे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचे व विद्यार्थ्यांचे मनोगते घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यशाळेचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.सचिन कसबे तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुप्रिया काळे व आभार प्रदर्शन प्रा.प्रतिक्षा सुकाळे यांनी केले.

