Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

जुन्नर नगरपरिषद येथील राज्यस्तरीय मराठी वक्तृत्व स्पर्धेत न्यू इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश



प्रतिनिधी : सुरंजन काळे

जुन्नर नगर वाचनालय व स्वराज्य मित्र मंडळ, जुन्नर या ठिकाणी शुक्रवार दि.१५ऑगस्ट २०२५ रोजी राज्यस्तरीय भव्य मराठी वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.

 या स्पर्धेमध्ये आपल्या आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचलित, न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, घोडेगाव मधील विविध वयोगटातून एकूण२७ विद्यार्थी सहभागी झाले होते.

यापैकी खालील विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण करून यश संपादन केले आहे.

बक्षीस पात्र विद्यार्थ्यांची नावे खालील प्रमाणे:

*इ. १ली ते २री गट:*

कु. अभिनव तानाजी बोऱ्हाडे (प्रथम क्रमांक) 

कु. क्रिशा निखिल आर्वीकर (तृतीय क्रमांक) 

*इ .३री ते ४थी गट:* 

कुमारी आर्या स्वप्नील वाळुंज (प्रथम क्रमांक) 

कु. अनुजा हर्षद राऊत(उत्तेजनार्थ) 

 *इयत्ता ८वी ते१०वी गट:* 

कु. ऋतिका रवींद्र जैद (प्रथम क्रमांक)

कु. अनुष्का वसंत लांघी (तृतीय क्रमांक) 

कु. स्नेहल दत्तात्रय डुकरे (उत्तेजनार्थ) 

या स्पर्धेत सर्वात जास्त एकूण सात बक्षिसे विद्यालयाने विद्यालयाने पटकावली आहेत.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मराठी विषय शिक्षिका सौ .वंदना वायकर सौ. सुषमा फलके ,सौ सुनीता वाजे, सौ प्रज्ञा घोडेकर, सौ. जागृती महाजन यांनी मार्गदर्शन केले.sanstheche अध्यक्ष श्री तुकाराम काळे ,उपाध्यक्ष एडवोकेट श्री संजय आर्वीकर, कार्याध्यक्ष श्री सुरेश शेठ काळे, संस्थेचे सचिव श्री विश्वासराव काळे, जॉईंट सेक्रेटरी श्री प्रशांत काळे, समन्वय समिती चेअरमन श्री राजेश काळे, खजिनदार श्री सोमनाथ काळे, वस्तीगृह कमिटी चेअरमन श्री सूर्यकांत गांधी, विद्यालयाचे चेअरमन श्री बाळासाहेब काळे, संस्थेचे संचालक श्री अजित काळे व श्री अक्षय काळे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे तसेच पालकांचे हार्दिक अभिनंदन केले. आपले विद्यार्थी शालाबाह्य राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून संस्थेच्या नाव लौकिकात भर घालत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे गौरवोद्गार श्री सोमनाथ काळे सर यांनी काढले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.