विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर वाणिज्य विभाग व संशोधन केंद्रामार्फत प्रथम वर्षाच्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी ‘दीक्षारंभ कार्यक्रम 2K25 उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनाची ओळख,सेवा-सुविधांची माहिती व नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) याबाबत मार्गदर्शन करणे हा होता.
वाणिज्य विभाग प्रमुख प्रा डॉ. सतिश जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले वाणिज्य विभागातील भविष्यातील संधींची माहिती दिली. प्रमुख पाहुणे,वैज्ञानिक अधिकारी व आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक मा.श्री सचिन एस.शेरकर यांनी ताण-तणाव व्यवस्थापन,एकाग्रता,संवाद कौशल्य,वेळ व्यवस्थापन व नेतृत्वगुण या विषयावर मार्गदर्शन केले.डॉ.पुनम माने यांनी NEP 2020 अंतर्गत अभ्यासक्रम,शिक्षणपद्धती व मूल्यांकन प्रणाली यांचे सविस्तर विवेचन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य व विज्ञान शाखा प्रमुख डॉ.रवींद्र चौधरी यांनी मूल्याधिष्ठित शिक्षण,करिअर संधी व आत्मविकासावर प्रबोधनात्मक विचार मांडले. कला विभाग प्रमुख डॉ. अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांनी बहुआयामी शैक्षणिक दृष्टीकोनातून मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष मा.ॲड. संजयराव शिवाजीराव काळे, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.विलास कुलकर्णी तसेच प्राचार्य डॉ. महादेव वाघमारे यांनीही बहुमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सारिका बनकर केले व आभार प्रा.जयश्री कणसे यांनी मानले.वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत नवीन शैक्षणिक प्रवासाची प्रेरणा घेतली.


