Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

प्रविण ताजणे यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार.....



महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे यांच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार जुन्नर तालुका विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष व अण्णासाहेब आवटे विद्यामंदिर जुन्नर येथील विज्ञान शिक्षक प्रविण रामदास ताजणे यांना देण्यात आला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे व मावळ तालुका यांच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2025 प्रवीण ताजणे यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन देण्यात आला. याप्रसंगी पुणे महानगरपालिका नियोजन समिती सदस्य संतोष भेगडे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष गुलाबराव गवळे, जिल्हाध्यक्ष निलेश काशीद, कार्यवाहक महेश शेलार आदींसह शिक्षक परिषदेचे पदाधिकारी व शिक्षक उपस्थित होते. प्रविण ताजणे यांचे जुन्नर तालुक्यातील विज्ञान व गणित शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.