विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. जागतिक पर्यटन दिना निमित्ताने विद्यार्थ्यांना ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्यावर शैक्षणिक भेट आयोजित करण्यात आली.
या उपक्रमात महाविद्यालयातील सर्व स्वयंसेवकांसोबत प्राध्यापक व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.शिवनेरी किल्ल्याच्या परिसरात विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाविषयी माहिती देण्यात आली.तसेच शिवनेरीच्या वास्तुशैली, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
भेटी दरम्यान विद्यार्थ्यांनी गंगा-जमुना पाणवठा,माता शिवाई देवीचे मंदिर, बालशिवाजींचा पाळणा,महाद्वार यांसारखी विविध ऐतिहासिक ठिकाणे पाहिली.“पर्यटनामुळे इतिहास जिवंत राहतो तसेच स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होते”असे प्रतिपादन या वेळी उपस्थित असणारे प्रा.एस.बी.गवळी यांनी केले.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे यांनी शुभेच्छा दिल्या.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम. बी. वाघमारे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करताना, वारसा आणि पर्यटन यांचा संगम जपणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ सुप्रिया काळे, प्रा.जयश्री कणसे,प्रा.विष्णू घोडे,प्रा.मयूर चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
