विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले
स्वच्छता ही सेवा अभियान 2025 भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना कक्ष महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त "एक दिन, एक घंटा,एक साथ" राष्ट्र स्वच्छता अभियान श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे यशस्वीपणे राबविण्यात आले. अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.महेंद्र कोरडे यांनी दिली.सदर अभियानामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे, प्राध्यापक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग,तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवक व इतर विद्यार्थी यांनी अभियानात सहभाग नोंदवला.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.त्यानंतर महाविद्यालय व परिसर स्वच्छ करण्यात आला. सदर अभियानाची सुरुवात श्रीमती मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय,सांगली या ठिकाणावरून श्री चंद्रकांत दादा पाटील,मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते ऑनलाईन स्वच्छतेची शपथ देऊन उद्घाटन व मार्गदर्शन झाले. ऑनलाईन कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांनी ऑनलाइन सहभाग नोंदवला. या विशेष कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या.

