प्रतिनिधी : सचिन भोजने
जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे मंगरूळ पारगाव येथे कार्यरत असणारे अनाथ निराधार यांच्यासाठी सेवा करणारी स्वप्नवेध अनाथालय फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने समाजातील कर्तबगार नऊ महिलेचा सन्मान करण्यात आला सामाजिक,शैक्षणिक,
क्रीडा प्रशासकीय क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या महिलाना सन्मान नवदुर्गांचा हे सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . मान्यवरांचा सन्मान ह.भ.प बबन महाराज डुकरे व इतर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते पत्रकार स्नेहा बारवे, शितल कोटकर, प्रियांका सस्ते ,उषा डुकरे, अनिता घोडे, वनिता पाबळे, शुभांगी सोनवणे, सुकेशिनी हिंगे, ,लताबाई उंडे या महिला नवदुर्गांना सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमा प्रसंगी समर्थ भारत साप्ताहिकचे संपादक समीर पठाण, विजयशेठ गाडगे, भाजपा महिला सरचिटणीस सुनंदाताई गाडगे, अजित नानाभाऊ गाडगे,ॲड.संतोष गाडगे सर , पत्रकार निलेश गाडगे , पत्रकार सुनिल गहिने , पत्रकार नवीन सोनवणे, संतोष काशिनाथ गाडगे , शुभम चव्हाण,मंगल गांधी,कविता पवार, मंगल भोजने, डॉ प्रिया बोरा, मिना जाधव संकेत लोखंडे, बाबू बोऱ्हाडे, डॉ. सतीश बोरा, सनी उनवणे,डॉ. हिंगे,श्रीरंग गाडगे, बबन घुले, विजय सोनवणे,संपत थोरात,सुंनदा भापकर, सारीका घोडे,प्रांजल गाढवे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वप्नवेधच्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नवेध अनाथालयाचे संस्थापक सचिन भोजने यांनी केले तर आभार ॲड.संतोष गाडगे सर यांनी मानले
