प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित, समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स,समर्थ लॉ कॉलेज बेल्हे,यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शैक्षणिक संकुलात राष्ट्रीय सेवा योजना दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ कॅम्पुटर सायन्स चे प्राचार्य डॉ.उत्तमराव शेलार,डॉ.लक्ष्मणराव घोलप,समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक प्रदीप गाडेकर,डॉ.शरद पारखे,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,समर्थ लॉ कॉलेजचे उपप्राचार्य शिवाजी कुमकर,कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे,प्रा.दिनेश जाधव,प्रा.सोमनाथ गाडेकर,प्रा.अश्विनी खटिंग,प्रा.कल्याणी शेलार उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन विद्यापिठ गीत व राष्ट्रीय सेवा योजना प्रेरणागीताने झाली.त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे महत्त्व यावर मार्गदर्शनपर व्याख्याने घेण्यात आली.वक्त्यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी समाजकार्याशी कसे जोडले जातात,आणि त्यातून त्यांच्यात नेतृत्वगुण कसा विकसित होतो.हे सांगितले.
प्राचार्य डॉ.लक्ष्मण घोलप यांनी आपल्या मनोगतात सांगितले की,राष्ट्रीय सेवा योजना समाजभिमुख कार्यासाठी विद्यार्थ्यांना घडवणारी आणि जबाबदार नागरिकत्व निर्माण करणारी चळवळ आहे.विद्यार्थी समाजासाठी कार्यरत राहतील,तरच खरी राष्ट्रसेवा साध्य होईल.
आपल्या मनोगतामध्ये प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी सांगितले की Not Me, But You हे राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य आहे.या ब्रीदवाक्यातून स्वयंसेवकांना खूप मोठी प्रेरणा मिळते कारण यातून स्वयंसेवकांना स्वार्थापेक्षा परमार्थ मोठा आहे हा संदेश मिळतो.विद्यार्थी समाजासाठी, पर्यावरणासाठी,राष्ट्रासाठी काम करायला शिकतात.सेवा,त्याग,जबाबदारी व सहकार्य या मूल्यांचा संस्कार घडतो.एकतेतून शक्ती निर्माण होते आणि नवीन भारत घडवण्याची प्रेरणा मिळते.म्हणूनच,“Not Me, But You” हे केवळ घोषवाक्य नसून,निःस्वार्थ सेवा, समाजाभिमुखता आणि राष्ट्रनिष्ठा यांची खरी शिकवण आहे.
या विशेष दिनानिमित्त स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियान,वृक्ष दिंडी,वृक्षारोपण,तसेच सामाजिक जनजागृती रॅलीचे आयोजन केले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीत “स्वच्छ भारत–सुंदर भारत”, “पर्यावरण वाचवा” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके यांनी सर्वांना राष्ट्रीय सेवा योजना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे यांनी केले तर प्रा.सोमनाथ गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
अशा प्रकारे समर्थ शैक्षणिक संकुलातील राष्ट्रीय सेवा योजना दिन समाजकार्य, जनजागृती आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.
