विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय,जुन्नर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत दि २४/०९/२०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थी प्रिय प्राध्यापकांची निवड करण्यात आली.तसेच स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम बी वाघमारे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत कला शाखेतून प्रा.डॉ.ए.एस.पाटील,वाणिज्य शाखेतून प्रा.सौ.जे.एन कणसे आणि विज्ञान शाखेतून प्रा. रोहित जोशी यांचे विद्यार्थी प्रिय प्राध्यापक निवडीबाबत सत्कार करण्यात आले.संपूर्ण महाविद्यालय परिसरात जमा झालेले प्लास्टिक व इतर कचरा राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी एकत्रित गोळा करून नगरपालिकेस सुपूर्द करत महाविद्यालय परिसर साफ व स्वच्छ केला.या उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड. संजय शिवाजीराव काळे यांनी शुभेच्छा दिल्या.तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.राष्ट्रीय सेवा योजना दिन साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.महेंद्र कोरडे,डॉ.सुप्रिया काळे, प्रा.मयूर चव्हाण,प्रा.सौ.जे.एन कणसे,प्रा. विष्णू घोडे यांनी केले.


