विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय, जुन्नर व रिलायन्स फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३०सप्टेंबर ते ०६ऑक्टोबर २०२५ या कालावधीत महाविद्यालयामध्ये प्रशिक्षण व नोकर भरती कार्यशाळा (ट्रेनिंग व जॉब ड्राईव्ह) या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन मंगळवार दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यशाळेमध्ये रिलायन्स फाउंडेशन पुणे या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षक सौ.कविता प्रसाद,श्री.मनीष भोसले व प्लेसमेंट ऑफिसर श्री. संतोष तांबे यांनी विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल,बायोडाटा तयार करणे,संभाषण कौशल्य व सायबर सुरक्षा अशा विविध प्रकारच्या कौशल्यांचे प्रशिक्षण दिले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी नोकर भरती प्रक्रिया (प्लेसमेंट ड्राईव्ह) राबविण्यात आली. या कार्यशाळेसाठी एकूण ५९ विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती.
त्यापैकी प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या ४४ विद्यार्थ्यांना बँक, आयटी ऑफिस, फायनान्स व प्रोडक्शन अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीची संधी प्राप्त झाली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे,आय.कयू.ए.सी प्रमुख डॉ.व्ही.एच लोखंडे तसेच प्रोजेक्ट मॅनेजर श्री. विशाल वाघमारे व प्लेसमेंट मॅनेजर श्री.अमोल तांबे, रिलायन्स फाउंडेशन, पुणे यांचे हस्ते नोकरीसाठी निवड झाल्याचे पत्र (प्लेसमेंट ऑफर लेटर) वितरित करण्यात आले.
नोकर भरती प्रक्रियेसाठी विविध कंपन्यांचे ह्युमन रिसोर्स मॅनेजर श्री.सुरज तायडे, टाटा कंपनी; माधुरी वासनिक,सिनूमेरो कंपनी; निकिता भोगवडे, ग्रीन आय. टी. रिसायकलिंग सेंटर प्रा. लिमिटेड; आणि श्री.अभिषेक सावेकर, एस. बी. आय., तसेच श्री. परमेश्वर खेडकर व ओमकार नांदूर, आदिराज मॅन पॉवर प्रा. लिमिटेड व इतर मान्यवर उपस्थित होते.
संयम ठेवून मिळालेल्या संधीचे सोने करावे असा मोलाचा संदेश अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी यांनी आपल्या भाषणामधून विद्यार्थ्यांना दिला. विदयार्थी हितासाठी महाविद्यालय नेहमी अग्रेसर राहून अशा अनेक संधी यापुढेही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देईल,असे आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांनी सांगितले.महाविद्यालयाच्या वतीने या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे व सर्व विश्वस्त मंडळ यांच्यावतीने मोलाचे आर्थिक सहकार्य लाभले. अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी व प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन प्लेसमेंट सेल विभाग प्रमुख डॉ.अशोक दुशिंग,प्रा. संदिप थोरवे व प्रा.राहुल सहाणे यांनी केले,तर सूत्रसंचालन प्रा.एस.के.बनकर व प्रा.कांचन वर्पे यांनी केले. डॉ.व्ही.एच. लोखंडे यांनी आभार मानले. कार्यक्रम प्रसंगी प्लेसमेंट विभागातील सदस्य प्रा. एस. ए. परदेशी व प्रा.मयुरी कुंभोजे, तसेच श्री मितेश गाडेकर,श्री कुमार सूर्यवंशी,श्री.योगेश मस्करे,श्री.सिताराम शेळकंदे व श्री.एकनाथ घुटे यांचे सहकार्य मिळाले.

