विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत 'पदवी काळात स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी?' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून युनिक अकॅडमी पुणे येथील श्री कैलास भालेकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमारे होते.
प्रमुख मार्गदर्शक श्री.कैलास भालेकर यांनी आजच्या काळात स्पर्धा परीक्षा कशी महत्त्वाची आहे.हे सांगून त्याची बेसिक तयारी कशी करावी,तसेच पूर्व,मुख्य आणि मुलाखत या तीनही टप्प्यासाठी महत्त्वाचा आणि मोजकाच अभ्यास करून कसे यश मिळवता येईल हे विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यांनी स्वतःचे परीक्षेच्या संदर्भातील अनुभव कथन करत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत भाग घेण्याची स्फूर्ती मिळाली.अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रा.डॉ. एम.बी.वाघमारे यांनी आजच्या आधुनिक काळात स्पर्धा परीक्षा आपल्याला फार मोठे करिअर मिळवून देऊ शकते.
आपल्या अंगी चिकाटी,जिद्द आणि प्रयत्नांची गरज असते.त्यामुळे आजच्या या मार्गदर्शनातून स्फूर्ती घेऊन आपले अनेक विद्यार्थी भविष्यात अधिकारी बनावे असे आव्हान विद्यार्थ्यांसमोर ठेवले.स्पर्धा परीक्षा देऊन नवीन करिअरच्या संधी पदरात पाडून घ्या असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.आर.डी चौधरी,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक डॉ.ए.एस पाटील,वाणिज्य शाखाप्रमुख डॉ.एस.जे जाधव उपस्थित होते.डॉ.ए.एस. पाटील यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून आजच्या काळातील स्पर्धा परीक्षेची गरज लक्षात घेता आजचे मार्गदर्शन म्हणजे आपल्याला एक सुवर्णसंधीच आहे तिचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन जीवनात उपयोग करून घ्यावा असे सांगितले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी यांनी शुभेच्छा देऊन कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.व्ही.व्ही.देसाई यांनी केले , पाहुण्यांचा परिचय प्रा.के.एस. वानखेडे तर आभार प्रा.जे.वाय शेख यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.


