प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे, या अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला व नव्या संकल्पनांना वाव देण्यासाठी 'आविष्कार' पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध शाखा मधील विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवत विज्ञान तंत्रज्ञान आणि सामाजिक जाणीव या विषयावर कल्पकतेने प्रकाश टाकला.
स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे सर यांच्या हस्ते करण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की अशा स्पर्धा विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि संशोधनाची वृत्ती जागृत करतात.शिक्षणासोबत कल्पनाशक्ती व कृतिशीलता विकसित करणे ही काळाची गरज आहे.नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास करताना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित राहू नये तर कल्पनांना प्रत्यक्ष कृती रूप देणे आवश्यक आहे.अशा पोस्टर्स स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पनांची बीजे रूजतात व भविष्यात संशोधनाची दारे खुली होतात.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता, हरित ऊर्जा ,पर्यावरण संवर्धन ,डिजिटल इंडिया, स्टार्टअप आयडियाज, शाश्वत विकास अशा विषयांवर आकर्षक व माहितीपूर्ण पोस्टर्स सादर केले.
पोस्टर स्पर्धेमध्ये गटनिहाय निवड झालेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे :-
*मेकॅनिकल विभाग* :-(गट-१)-वैभव भालेराव, मुजावर आफताब, कुणाल बडवे, स्नेहल पटेल,
(गट-२):-प्रवीण गुंजाळ, विठ्ठल कोळेकर, यश गुंड, ओंकार पिंपरकर.
*सिव्हिल विभाग:-(* गट-१)-तनिष्का क्षीरसागर, विशाखा भोंगळे,साक्षी गाडीलकर,ज्ञानेश्वरी शिकारे
*कॉम्पुटर विभाग :-* (गट-१)- कल्याणी घोलप,समीक्षा जाधव,निलोफर शेख.
(गट-२)- मानसी यादव, सुप्रिया शेळके, सानिका लामखडे.
*इलेक्ट्रिकल विभाग:-* (गट-१)-शिवांगी वाळुंज, श्रद्धा साठे,कोमल ढोले.
(गट-२)-शुभम चासकर, गायत्री गोरडे,पूजा फापाळे.
*ए.आय. एम. एल.विभाग* :-(गट-१) -अथर्व थोरात, सुयश आवटे.
(गट-२)-साहिल बोराडे, रोहित राजपूत, अजिंक्य तोडकर,
*ए.आय.डी.एस. विभाग:-(* गट-१)-पूजा बांगर,दीप्ती गुंजाळ, किरण सागर, (गट-२)-गौरी झावरे, चैताली सोमवंशी,
*इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग* :-(गट-१)-माधुरी शिंदे, पूजा जाधव, साक्षी गोरडे, (गट-२)-वैष्णवी तनपुरे, पूर्वा बाणखिले,अनुष्का मांडे,साक्षी भोर
*एम.बी.ए विभाग :-* (गट-१)-निकिता भोर,मृणालिनी शिरतार, (गट-२)- मृणाल गावडे, तेजल डोके
*एम.सी.ए विभाग:-* (गट-१)-आदित्य हिलाळ, तुषार वाघदरे,शुभम गाडगे.
या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी प्रा.अमोल खतोडे (मेकॅनिकल विभाग),प्रा.अमोल भोर (सिव्हिल विभाग), प्रा.निर्मल कोठारी, (इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग) प्रा.स्नेहा सेगर,(कॉम्प्युटर विभाग), प्रा. निलेश नागरे, (इलेक्ट्रिकल विभाग), प्रा. शुभम शेळके (ए. आय.एम.एल.विभाग ) प्रा. गोपाळे सर( एम.सी.ए. विभाग), डॉ. महेश भास्कर ( एमबीए विभाग ) हे परीक्षक म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांची मांडणी, संकल्पना, दृश्य परिणामकारकता आणि विषयाशी संबंधितता या विषयावर बारकाईने परीक्षण केले
विद्यार्थ्यांच्या या कलागुणांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत यांनी कौतुक केले.
या स्पर्धेचे यशस्वी आयोजन डॉ. संदीप नेहे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.सचिन पोखरकर यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या कलात्मक व बौद्धिक प्रयत्नांचे कौतुक केले.

