वार्ताहर : प्रा. प्रविण ताजणे सर
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत खिरेश्वर आश्रम शाळेमध्ये जननायक क्रांतिसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्ताने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.आदिवासी समाजातील दुर्लक्षित असलेले परंतु ज्यांनी भारत देशाला स्वतंत्र मिळवण्यासाठी सर्वात जास्त लढाया व आंदोलने केली त्या महान क्रांतिकारक विषयी प्रा.शंकर घोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विविध प्रकारची उदाहरणे देऊन क्रांतिकारकांचे कार्य विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. क्रांतिकारकांनी देशाला स्वतंत्र मिळावे यासाठी अहोरात्र कष्ट घेतले परंतु विद्यार्थ्यांनी उत्तम प्रकारे गुण मिळवण्यासाठी अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाचे येऊ घातलेले नवीन शैक्षणिक धोरणात होणारे बदल प्रा.शंकर घोडे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. NEP धोरणा स्वीकारत असताना वचन व समजून घेणे तसेच स्व मताला महत्व देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा तसेच मोबाईल पासून होणारे फायदे व तोटे समजाऊन सांगितले. यामध्ये श्री.देवराम डावखर व अधीक्षक श्री.जाधव सर यांनी आपली मनोगते मांडली. विद्यार्थ्यानी अध्यक्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या जीवनावर आधारित पथनाट्य सादर केले. प्रा.शंकर घोडे यांनी पथनाट्याला शुभेच्छा देऊन त्यांना प्रोत्साहन दिले.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक श्री.मुंढे सर उपस्थित होते. ज्यांना नुकताच आदिवासी विभागाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला असे विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री. कैलास गारे सर यांनी कार्यक्रमाचे नियोजन व प्रास्ताविक केले. या कार्यक्रमासाठी तळेरान गावचे माजी पोलीस पाटील श्री.देवराम डावखर, सामाजिक कार्यकर्ते श्री. दुंदा घोडे,श्री. कमा घोडे उपस्थित होते.


