विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर : श्री शिव छत्रपती महाविद्यालय अंतर्गत तक्रार समिती (ICC)लैंगिक छळ (प्रतिबंध, विरोध व निवारण)-POSH ACT 2013 या विषयावर महाविद्यालयामध्ये सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण घडवण्याच्या दृष्टीने प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी प्रा. स्नेहा गायकवाड यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी बोलताना त्यांनी कायदयाची माहिती (POSH Act-2013)दिली.लैंगिक छळाअंतर्गत येणारी कृत्ये, कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसंबंधी जागरूकता यासंदर्भात ICC च्या जबाबदाऱ्या,कार्य व भूमिका याबाबत तपशिलवार मार्गदर्शन केले. महाविदयालयात विद्यार्थिनी व महिला प्राध्यापक कर्मचारी यांसाठी ही समिती स्थापन केली आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ.एन.एम.हिरेमठ उपस्थित होत्या. संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी कुलकर्णी यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम. बी.वाघमारे यांनी भुषविले.त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सुरक्षे संबंधी जागरूकता व कायदा यासंबंधी उदाहरणे देवून मार्गदर्शन केले.याप्रसंगी वरिष्ठ महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. रविंद्र चौधरी,कनिष्ठ महाविदयालयाच्या समन्वयक प्रा.प्रतिभा लोढा,पर्यवेक्षक प्रा. समीर श्रीमंते,एम.सी.व्ही.सी. विभाग प्रमुख प्रा.नेटके सर प्रबंधक सौ.एम.डी.कोरे व सर्व विभागांचे विभाग प्रमुख , प्राध्यापक वर्ग मोठया प्रमाणावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागाच्या प्रमुख डॉ .एस एच. काळे यांनी केले.पाहुण्यांचा परिचय सौ.एम.डी.कोरे यांनी करून दिला.सूत्रसंचालन प्रा. एस.डी.सोनार यांनी तर आभार प्रा.सौ.ए.एम.दुराफे यांनी केले.

