जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडीचे पाच विद्यार्थी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी गुणवत्ता यादीत आल्याबद्दल व एक विद्यार्थी नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र ठरल्याने मार्गदर्शक शिक्षिका आशा सुनील पाटील यांना जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षक व नवोदय विद्यार्थी मार्गदर्शक शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
मांजरवाडी शाळेतील सार्थक विजय मुळे शिष्यवृत्ती परीक्षेत 282 गुण मिळवून राज्यात नववा व जुन्नर तालुक्यामध्ये प्रथम, साईराज सचिन मावकर 274 गुण मिळवून नवोदय साठी पात्र ठरला आहे.जिल्हा गुणवत्ता यादीत आला असून जुन्नर तालुक्यात द्वितीय,मधुरा नामदेव थोरात 270 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत आली असून जुन्नर तालुक्यात पाचवा क्रमांक,श्रीवेद सुरज पोखरकर 260 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत आला आहे.आर्या अविनाश मुळे 248 गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत आली आहे.या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा व जवाहर नवोदय परीक्षांमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरवाडीच्या व जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या वर्गशिक्षिका आशा सुनील पाटील यांचा सन्मान जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह,शाल व बुके देऊन नुकताच करण्यात आला.
याप्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर,पतसंस्थेचे सभापती अनिल कुटे,उपसभापती सुनीता वामन,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मंगेश मेहेर,पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सरचिटणीस खंडेराव ढोबळे,जुन्नर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष रमाकांत कवडे,कार्याध्यक्ष वैभव सदाकाळ,सरचिटणीस प्रभाकर दिघे,संचालक रवींद्र वाजगे, अंबादास वामन,अविनाश शिंगोटे,जितेंद्र मोरे,माजी सभापती विजय लोखंडे,संतोष पाडेकर, सविता कुऱ्हाडे,नानाभाऊ कणसे, दत्तात्रय घोडे,सुभाष दाते,पुनम तांबे,दिलीप लोहकरे,सचिन मुळे, गवारी,रियाज मोमीन,कमलाकांत मुंढे,दिनेश मेहेर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पतसंस्थेचे सभापती अनिल कुटे यांनी तर सूत्रसंचालन संचालक सचिन मुळे यांनी केले.
