Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

समर्थ पॉलीटेक्निक मध्ये इंडक्शन २०२५ उत्साहात संपन्न



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक,बेल्हे या तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचा इंडक्शन अर्थात प्रवेशोत्सव कार्यक्रम अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.

या कार्यक्रमा अंतर्गत वेगवेगळ्या मान्यवर तज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये संतोष सांघवे-व्यक्तिमत्व विकास,महेश कोल्हे -सायबर सिक्युरिटी,नितीन सोनवणे-ड्रोन टेक्नॉलॉजी,विशाल सुळे-रोबोटिक्स,अथर्व शिंदे-ओव्हर व्ह्यू ऑफ वेब,ॲप,रोबोटिक्स अँड डेव्हलपमेंट,प्रा.सचिन शेळके-थ्री डी प्रीटिंग या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या निमित्ताने पोस्टर सादरीकरण,विज्ञान प्रश्नमंजुषा,जनरल नॉलेज प्रश्नमंजुषा या कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते.

या स्पर्धेमध्ये प्रत्येक अभ्यासक्रमात प्रवेशित ३६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रातीनिधीक स्वरूपात सन्मान करण्यात आला. यावर्षी समर्थ पॉलीटेक्निक मध्ये १०० टक्के प्रवेश पूर्ण झाल्याने संस्थेच्या वतीने सर्व शिक्षकांचे अभिनंदन करण्यात आले.समारोप प्रसंगी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.इंजिनियरिंगच्या प्रत्येक कौशल्याला सध्या महत्त्व आहे.या स्पर्धेच्या युगात प्रत्येक विद्यार्थ्याने कौशल्य प्राप्त करणे आवश्यक आहे. समर्थ पॉलीटेक्निक मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जातात.त्यामुळे गुणवत्ता पूर्ण विद्यार्थी समर्थ संकुलामध्ये तयार होतात आणि हे विद्यार्थी आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी होतात असे मत वल्लभ शेळके यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले 

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले, सर्व विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.शाम फुलपगारे सर,प्रा.आदिनाथ सातपुते,प्रा.स्वप्नील नवले,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.संकेत विघे,प्रा.आशिष झाडोककर यांनी विशेष प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ईश्वर कोरडे यांनी तर आभार उपप्राचार्य प्रा.संजय कंधारे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.