प्रतिनिधी | प्रा. अनिल निघोट सर
पुणे : नावाजलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडी चे अनेक पुरस्कार विजेते, प्रेरणादायी व्यक्तिमत्व व
उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री पोतरे माधव दत्ता जि. प. प्रा. शा. पन्हाळवाडी ता भूम जि. धाराशिव येथील श्री माधव पोतरे सर यांच्या विविध उपक्रम, गुणवत्ता, खाजगी स्पर्धा परीक्षा, शालेय व्यवस्थापन,लोकवट्यातून शाळेचा केलेला कायापालट इत्यादी कार्याची दखल घेऊन... अमेरिकेचा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड ,जिनीअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार हे तीन आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय , भारतभुषण राष्ट्रीय पुरस्कार व आयडाल ऑफ महाराष्ट्र २०२५ राज्यस्तरीय पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यात आले.
यापुर्वीही माधव पोतरे सरांना आदर्श महाराष्ट्र शिक्षक रत्न पुरस्कार, महाराष्ट्र किर्ती पुरस्कार ती
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला होता.
त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे!
गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री भट्टी साहेब, केंद्रप्रमुख सन्माननीय श्री कांबळे मिलिंद (दादा ) केंद्राचे विषय शिक्षक श्री तात्यासाहेब हुंबे साहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका सहकारी भगिनी श्रीमती कोकाटे वनिता ,पालक, ग्रामस्थ, आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करुन श्री माधव पोतरे यांनी ही शैक्षणिक कामाची पावती मिळाल्याची भावना व्यक्त करत पुढील कामासाठी हा पुरस्कार प्रेरणा देत राहील अशा शब्दात शाळेचे ॠण व्यक्त केले.


