पुणे : साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन या महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा देशपातळीवर प्रचार प्रसार करत असलेल्या संस्थेने नुकत्याच गुणवंता़साठी जाहीर केलेल्या पुरस्कारांच्या नामांकनात आलेल्या मंचर येथील डॉ एम.ए.खान बी.एड.कालेजच्या प्रा.अनिल नारायण निघोट यांना राष्ट्रीय भारत भुषण आदर्श प्राध्यापक पुरस्कार मिळाला असून,पुणे येथील इतिहास संशोधन मंडळ येथे येत्या २४ आगस्ट लाख सर्व पुरस्कार प्राप्त गुणवंतांना राष्ट्रीय पुरस्कार वितरण झाले.
प्रा.अनिल निघोट व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना राष्ट्रीय स्तरावरील भारतभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
प्रा.अनिल नारायण निघोट निघोटवाडी मंचर येथील रहिवासी असून प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक, महाविद्यालय व पदव्युत्तर असा तीस वर्षे अध्यापनाचा अनुभव असुन दोन हजारांवर शिक्षक प्राध्यापक , मुख्याध्यापक, प्राचार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. बी.एड् स्तरावरील सोळा वर्ष प्राध्यापक म्हणून अनुभव असुन त्यांचे ज्ञानदान व नवनवीन शिक्षक घडवण्याचे काम सतत चालूच आहे.शिक्षकांप्रमाणेच शेकडो विद्यार्थी त्यांनी घडवले असुन विविध क्षेत्रात सेवा बजावत आहे, प्रा.अनिल निघोट यांनीही अडीच हजार पेक्षा जास्त शिष्यवृत्ती, नवोदय,दहावी, बारावी तील गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक वर्षी या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम घेत ट्राफी, स्कूल बैग, शालेय साहित्य देऊन गुणवंतांचा गौरव केला असुन पाचशे पेक्षा जास्त मान्यवरांना आंबेगाव तालुका भुषण, समाज भुषण, पत्रकार भुषण पुरस्कार व कारसेवक ज्येष्ठ शिवसैनिकांचा सत्कार केला असून शिवजयंती, धर्मवीर संभाजी महाराज,महाराणा प्रताप जयंती,नेताजी सुभाषचंद्र बोस,शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती ते प्रत्येक वर्षी साजरी करत असतात आजही शैक्षणिक क्षेत्रात प्राध्यापक अनिल निघोट काम करत असुन आजतागायत स्वतः ही शिक्षण घेत असुन एम.ए.सहा विषयात, एम.एड.,एम.फिल व तीन विषयांत सेट पात्र असुन सतत तीन वर्षे टि इ.टी., टेट शिक्षक अभियोग्यता गुणवत्ता यादीत आले असून, महाराष्ट्र सरकारच्या आदिवासी विभागात मुख्याध्यापक,डाएट च्या अधिव्याख्याता पदाच्या शासकीय स्पर्धा परीक्षा उत्तीरण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कमीत कमी फी मध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, मुलं हुशारच असतात, फक्त त्यांच्याकडुन करुन घेतले तर त्यांचा सर्वोच्च, सर्वांगीण विकास होऊ शकतो यासाठी मातोश्री शालीनीबाई नारायणशेठ निघोट ईंग्लिश मेडीअम स्कूल, स्मार्ट इंडीया स्कूल घ्या विविध गावांत शाखा काढून स्कुलबस प्रवासाचा वेळ वाचुन प्रवासाची दगदग, धावपळ कमी करुन मानसशास्त्रीय तत्त्वांनुसार भाषिक, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक, स्मरणशक्ती, हस्तकौशल्य, गायन,वादन, भजन स्पर्धा, क्रिडा व ईतर स्पर्धा सहभाग, उपक्रमशीलता , प्रकल्प व निरंतर मुल्यमापन, आवश्यक भौतिक सुविधांद्वारे लहान विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सर्वोच्च विकास साधण्याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या शिक्षकांना मार्गदर्शन करुन साधला
त्यामुळे स्वता गुणवत्ता यादीत येऊनही न शिक्षणाधिकारी पदं न स्वीकारता स्वीकारता आपल्या ग्रामीण भागातच सेवा देत विनाअनुदानित वर च काम करत असल्याचे प्रा.अनिल निघोट यांनी सांगितले, सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पीएचडी पदवीसाठी आपले फायनल संशोधन कार्य सादर केले असून, आपली शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी ओरीएंटेशन कार्यक्रम,तीन रिफ्रेशर कोर्स,तीन शार्ट टर्म कोर्स, एक फॅकल्टी ईंडक्शन प्रोग्राम दिडशे वर चर्चासत्र, सेमिनार,वेबिनार,कान्फरन्स केल्या असून, अभ्यासक्रम निर्मिती वर्कशाप, तसेच पंधराहुन जास्त संशोधन पेपर सादर केले असून, यापुर्वी त्यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार प्राप्त झाला होता.या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन होत असुन,यातुन शिक्षणक्षेत्रात टिकून रहाण्यासाठी ज्ञान, तंत्रज्ञानाबाबत सतत अपडेट रहावे लागेल,अजून माहिती ज्ञान व शिकण्यास प्रेरणा मिळाली असून ईतरांनी सुद्धा जास्तीत जास्त शिक्षण घेऊन भारतमातेची, समाजाची, आईवडीलांची सेवा करून आपली भारतीय, मराठी संस्कृती जोपासावी असे याप्रसंगी प्रा अनिल निघोट यांनी आवाहन केले.

