प्रतिनिधी | सचिन भोजने पाटील
गणेश उत्सवाच्या औचित्य साधून मंगरूळ येथील स्वप्नवेध अनाथालयातील बाल चिमुकल्यांनी विविध सामाजिक उपक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात राबवत आहे यंदाचा जिवंत देखावा हा आकर्षक ठरत आहे शेकडो लोक हा देखावा पाहण्यासाठी गर्दी करत आहे स्वप्नवेध अनाथालय आठ ते नऊ वर्षाच्या कालखंडात निराधारांचे मायबाप बनत असताना संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम समाजामध्ये राबवली जातात रक्तदान शिबिर कोरोना काळात गोरगरिबांना किराणा किट, सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार, हे काम करत असताना एका लेकीचे कन्यादान करण्याचा मान ही संस्थापक सचिन भोजने यांना बाप म्हणून मिळाला तसेच वृक्षांचे वाढदिवस मुलांना बाल संस्कार,शिवकालीन युद्ध कला, वकृत्व कला, मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी स्वप्नवेधने विविध उपक्रम राबविले आहेत संस्थेचे संस्थापक सचिन भोजणे हे बोलताना म्हणाले की स्वप्नवेध ही संस्था नसून एक परिवार आहे जीवनातले दुःख विसरायचं असेल तर एकदा स्वप्नवेधला अवश्य भेट द्या कारण दुःख असतानाही जीवन आनंदी कसे जगावे हे स्वप्नवेध मध्ये आल्यानंतर आपल्याला शिकायला मिळतं समाजामध्ये विविध प्रकारचे उपक्रम करत असताना स्वप्नवेध अनाथालयाच्या कार्याबद्दल समाजातून कौतुक होत आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने विविध उपक्रम देखावे सादर केले जातात परंतु अशा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करून त्यांना स्टेज उपलब्ध करून देणे ही कौतुक स्पद असून याचे कौतुक विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या माध्यमातून केले जात आहे
