प्रतिनिधी | प्रा. प्रविण ताजणे सर
जुन्नर तालुक्यातील निरगुडे येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष व डिसेंट फाउंडेशन, पुणे आणि जय हनुमान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ग्रामदैवत निरगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगणेशा आरोग्याचा “आरोग्य अभियान 2025“ अंतर्गत शुक्रवार दि. २९ ऑगस्ट २०२५ रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात हृदयविकार, मूत्रविकार, मधुमेह, कॅन्सर तपासणी, दंत तपासणी तसेच बी.पी., शुगर व रक्तातील विविध तपासण्या करण्यात आल्या. तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ११७ जणांनी या सेवांचा लाभ घेतला.
या शिबिरात श्री हॉस्पिटल आळेफाटा, डोके हॉस्पिटल नारायणगाव, श्रीकृष्ण दंतालय जुन्नर, हिंद लॅब जुन्नर यांचे विशेष सहकार्य लाभले.
शिबिराचे उद्घाटन डिसेंट फाउंडेशचे अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांच्या हस्ते झाले. यावेळी सचिव डॉ.एफ.बी.आतार , संचालक आदिनाथ चव्हाण ,डॉ.ज्ञानेश्वर गायकवाड,डॉ.दयानंद गायकवाड ,डॉ.रचना घोडे,शिबीर समन्वयक संतोष शिंदे, कृष्णा रोकडे तपासणी तज्ञ सपना बेलवटे,रंजना कदम ,मंगेश जगदाळे ,मंडळाचे अध्यक्ष शुभम तुपे,उपाध्यक्ष अमोल रोकडे, सचिव सुरज फुलसुंदर, खजिनदार दिनेश जेजुरकर ,बाळासाहेब रोकडे, सुरेश रोकडे,वसंत रोकडे,राजेंद्र शिंदे आदी मान्यवर आशा सेविका, परिचारिका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून या शिबिराचा लाभ घेतला. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिरांमुळे ग्रामीण भागातील लोकांना योग्य तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला मोफत उपलब्ध होत असल्याचे समाधान ग्रामस्थांनी व्यक्त केले.


