पुणे : शिक्षक दिनानिमित्त आयोजित 'नॅशनल आयकॉन अवॉर्ड २०२५' साठी नांदेड चे भूमिपुत्र व जि. प. प्रा. शा. पन्हाळवाडी ता. भूम. जि. धाराशिव येथील प्राथमिक शिक्षक श्री. पोतरे एम डी यांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना हा मानाचा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून हा पुरस्कार दरवर्षी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना प्रदान केला जातो. यामध्ये त्यांना यापूर्वी अनेक फॉउंडेशन तर्फे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.आदर्श शिक्षक श्री. माधव पोतरे यांच्या गेल्या १९ वर्षांतील शिक्षण क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्याची दखल घेऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार मलकापूर (जि. बुलडाणा) येथील भातृ मंडळ हॉलमध्ये ११ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
याआधीही पोतरे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून आदर्श शिक्षक रत्न पुरस्कार, भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार, अमेरिकेचा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, जिनीअस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड,लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड व आयडाल ऑफ महाराष्ट्र २०२५, अण्णाभाऊ साठे जीवनगौरव पुरस्कार २०२५असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उत्कृष्ट शाळा व्यवस्थापन, लोकवर्गणीतून विविध शालेय सुविधा व विद्यार्थी सर्वांगीण विकासासाठी राबविलेले विविध कार्यक्रम उपक्रम,पालकांचा सहभाग यामुळे विविध स्पर्धांतुन विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे त्यामुळे त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
