विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व श्री शिव छत्रपती महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित तालुका स्तरीय सीजन बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 चे आयोजन श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये दिनांक 30/08/2025 ते 31/08/2025 रोजी आयोजित करण्यात आली होती.स्पर्धेच्या आयोजना संदर्भात संस्थेचे अध्यक्ष ॲड संजय काळे यांनी विजयी संघाच्या खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगीअध्यक्ष प्रतिनिधी प्रा व्ही बी कुलकर्णी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे,उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,कनिष्ठ महाविदयालय समन्वयक प्रा. पी.एस. लोढा,पर्यवेक्षक प्रा.एस. ए.श्रीमंते,जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष श्री गणेश राऊत,सचिव श्री सचिन खराडे,वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख डॉ.ए. के.बढे ,कनिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रा एम एस बोंबले,प्रा.व्ही.पी.वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अध्यक्षीय स्थान स्वीकारून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देऊन खेळाडूंनी आपल्या खिलाडू वृत्तीचे दर्शन दाखवून तसा खेळ करावा.सदर स्पर्धेत तालुक्यातील सुमारे 35 संघांनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत एकूण 470 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.स्पर्धा अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
*14 वर्षाखालील मुले*
1) प्रथम क्रमांक- *रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा*
2)द्वितीय क्रमांक - *जे आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल आळे*
3)तृतीय क्रमांक- *व्ही. जे. इंटरनॅशनल स्कूल वडगाव कांदळी*
*17 वर्षाखालील मुले*
1)प्रथम क्रमांक- *ज्ञानमंदिर हायस्कूल आळे*
2)द्वितीय क्रमांक- *रा.प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव*
3)तृतीय क्रमांक- *कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येडगाव*
*19 वर्षाखालील मुले*
1)प्रथम क्रमांक- *रा. प. सबनीस विद्यामंदिर नारायणगाव*
2) द्वितीय क्रमांक- *समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे*
3)तृतीय क्रमांक- *कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येडगाव*
*19 वर्षाखालील मुली*
1) प्रथम क्रमांक- *कुकडी व्हॅली पब्लिक स्कूल येडगाव*
2)द्वितीय क्रमांक- *जे आर गुंजाळ इंग्लिश मीडियम स्कूल आळे*
3)तृतीय क्रमांक- *रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूल निवृत्तीनगर*
*17 वर्षाखालील मुली*
1)प्रथम क्रमांक- *ब्लूमिंगडेल इंटरनॅशनल स्कूल नारायणगाव*
2)द्वितीय क्रमांक- *रेडियन्स इंटरनॅशनल स्कूल आळेफाटा*
3)तृतीय क्रमांक- *जे आर गुंजाळ मीडियम स्कूल आळे*
सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पडण्यासाठी ज्युनिअर जिमखाना विभागातील सदस्य प्रा.विकास वाघमारे ,प्रा निलेश आमले,प्रा गणेश रोकडे, प्रा सागर भोर,प्रा योगेश घोडके,प्रा प्रदिप चिखले,प्रा राजेश कांबळे, प्रा शिवानंद वाघमोडे, प्रा निखिल सरजिने,डॉ तुषार कांबळे, प्रा चंद्रकांत कांबळे,प्रा संतोष गवळी तसेच शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयाचे श्री सुनिल बढे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.त्याबद्दल जिमखाना विभाग प्रमुख प्रा मयूर बोंबले यांनी सर्वांचे आभार मानले.
