Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या खेळाडूंचे तालुकास्तरीय बुद्धिबळ व क्रिकेट स्पर्धांमध्ये दैदीप्यमान यश



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय व क्रीडा परिषद पुणे,जुन्नर तालुका क्रीडा शिक्षक संघटना व छत्रपती विद्यालय जुन्नर आयोजित तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेमध्ये समर्थ ज्युनियर कॉलेज,बेल्हे या विद्यालयाच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे.उत्कृष्ट खेळ,शिस्तबद्ध सराव व संघभावना यांच्या जोरावर संघाने ही यशस्वी कामगिरी साध्य केली.समर्थ ज्युनियर कॉलेजच्या संघाने तालुका पातळीवरील सामन्यांमध्ये दमदार प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.फलंदाजी,गोलंदाजी व क्षेत्रक्षण या तिन्ही विभागात खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली.

क्रिकेट स्पर्धेमधील सहभागी खेळाडू: विघ्नेश पवार,ओम गाडगे, ऋतिक डुकरे,सुरज डुकरे,सिद्धेश बांगर, श्रेयस सुकाळे, प्रतीक सोनवणे,भावेश चिकने,गणेश परंडवाल,वेदांत औटी, श्रीराम दांगट,विपुल औटी,साहिल येवले,ऋषी वरखडे,चिराग झिंजाड,सार्थक कुंजीर,क्षितिज बुट्टे,वैष्णव दिवेकर,दर्शन भापकर, कृष्णा गाडगे.

त्याचप्रमाणे जुन्नर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी श्रुती शिंदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत बुद्धिबळ क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे.तालुकास्तरीय स्पर्धेत चमकदार खेळ करत तिने जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.श्रुतीच्या या यशाबद्दल तिचे कुटुंबीय,शिक्षक व मित्रपरिवार यांनी आनंद व्यक्त केला असून तिला पुढील खेळासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.तिच्या मेहनतीमुळे व चिकाटीमुळे हे यश मिळाल्याचे प्राचार्या वैशालीताई आहेर यांनी सांगितले.

क्रीडा संचालक एच पी नरसुडे,सुरेश काकडे,गणेश जाधव,विनायक वऱ्हाडी,राहुल अहिरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व जिल्हास्तरीय सामन्यातही संघ नक्कीच विजय मिळवेल असा विश्वास व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.