विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर येथे विद्यार्थिनी मंच विभागाच्या उद्घाटन समारंभाचे औचित्य साधून 'श्रावण मास आणि स्त्री' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून संस्थेच्या खजिनदार सौ.कांताताई म स्करे यांनी विद्यार्थिनींना 'श्रावण मास आणि स्त्री' विषयावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. श्रावण मासातील व्रतवैकल्ये,सण आणि त्यामध्ये स्त्रीचा असणारा सहभाग,सणांचे आध्यात्मिक महत्त्व या सर्वांचा अनुबंध त्यांनी श्रावणातील गाणी, फुगड्या, झिम्मा यांचे गायन करून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात विद्यार्थ्यांना पटवून दिले.
आजच्या विद्यार्थिनींनी या उद्याच्या कुटुंबवत्सल गृहिणी बनवायच्या असतील तर आपल्या परंपरागत संस्कृतीच्या सणांना विसरून चालणार नाही. असे प्रतिपादन त्यांनी केले तर कार्यक्रमचे अध्यक्ष म्हणून बोलताना प्रा.डॉ.आर.डी.चौधरी यांनी आजच्या आधुनिक पिढीला संस्कृती,व्रतवैकल्यांचे महत्त्व कसे गरजेचे आणि महत्त्वाचे आहे हे सांगून नागपंचमी हा सण साजरा करण्यामागचा वैज्ञानिक उद्देश मनोगतातून स्पष्ट केला. संस्थेचे अध्यक्ष ॲड.संजय शिवाजीराव काळे,अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम .बी. वाघमारे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा देऊन कौतुक केले.कार्यक्रम प्रसगी कला शाखाप्रमुख प्रा.डॉ.ए.एस.पाटील,वाणिज्य शाखाप्रमुख प्रा.डॉ.एस जे.जाधव,विद्यार्थिनी मंच विभाग प्रमुख डॉ.व्ही.व्ही.देसाई तसेच विद्यार्थिनी मंचातील सदस्य व इतर प्राध्यापक उपस्थित होते.विद्यार्थिनी मंच विभाग प्रमुख डॉ.व्ही.व्ही.देसाई यांनी प्रास्ताविकातून श्रावणातील सण उत्सवांमधील स्त्रियांच्या सहभागाचे महत्त्व पटवून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.व्ही.गायकवाड यांनी केले तर आभार डॉ.एस.एच.काळे यांनी मानले.

