समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांची 'क्यू-स्पायडर' व 'दि किरण अकॅडमी' या कंपनीमध्ये निवड झाल्याची माहिती अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे व समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ उत्तम शेलार यांनी दिली.
ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या "कॅम्पस ड्राईव्ह २०२५" अंतर्गत क्यू स्पायडर व दि किरण अकॅडमी या कंपनीच्या वतीने कॉप्यूटर,इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग इंजिनिअरिंग,इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग,मेकॅनिकल इंजिनियरिंग,एमसीए,एमसीएस,बीबीए,बीसीए च्या विद्यार्थ्यांसाठी मुलाखतीचे आयोजन नुकतेच समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या महाविद्यालयात करण्यात आले होते.
'क्यू-स्पायडर' कंपनीच्या वतीने एच आर ट्रेनर आशिथा व ऐश्वर्या यांनी तर 'दि किरण अकॅडमी' च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी किरण दिगरसे व शाखाप्रमुख आनंद धाडगे यांनी मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण केली.
त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये सर्व विद्यार्थ्यांची लेखी परीक्षेद्वारे कल चाचणी घेण्यात आली.त्यानंतर सांघिक चर्चा व व्यक्तिमत्त्व विकासावर आधारित मुलाखत घेऊन विद्यार्थ्यांची निवड केल्याची माहिती बँगलोर येथील क्यू स्पायडर ट्रेनर मिस आशिथा यांनी दिली.
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट विभागातील 'क्यू-स्पायडर' मध्ये निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
प्रशांत लोखंडे,सुप्रिया सालके,सानिका लामखडे,वैभव भालेराव,पृथ्वीराज चव्हाण,हर्षा शिंदे,मानसी यादव,विश्वजीत राउल,संग्राम देशमुख,सुदर्शन गवळी,विठ्ठल जाधव,वैष्णव जाधव,तौफिक पठाण,साजिदा पठाण,मानसी वायाळ,उमेश गोसावी,कुणाल बच्चे,अर्पिता लेंडे,प्रतीक भाईक,पूजा बढेकर,यश थोरात,गायत्री बोरुडे,रुपेश नवले,स्नेहल गाढवे,सिद्धी औटी,धीरज पाखरे.
'दि किरण अकॅडमी' या कंपनीमध्ये निवड झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे:
समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट या महाविद्यालयातील पृथ्वीराज चव्हाण,श्रुती गावडे,मानसी यादव,निकिता औटी,सुप्रिया सालके,राम इंगळे,वैष्णवी गायकवाड,अंकिता डोंगरे,जयेश आहेर,तेजस बाचकर या विद्यार्थ्यांची तर समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स या महाविद्यालयातील हर्षदा वायकर,पायल लोंढे,सानिया पठाण या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
सदर मुलाखतीचे यशस्वी नियोजन करण्यासाठी ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर,कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागप्रमुख प्रा.शुभम शेळके,बीसीएस विभागप्रमुख प्रा.प्रशांत काशिद यांनी परिश्रम घेतले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,सर्व संस्थांचे प्राचार्य,विभागप्रमुख व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
