प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
जिल्हा क्रीडा परिषद पुणे व जिल्हा क्रीडा कार्यालय पुणे अंतर्गत समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी बेल्हे बांगरवाडी येथे झालेल्या जुन्नर तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत समर्थ एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल व समर्थ ज्युनिअर कॉलेज बेल्हे बांगरवाडी या विद्यालयातील अनुक्रमे ११ व ४ खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाल्याची माहिती समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे व समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी दिली.
स्पर्धेचे उद्घाटन समर्थ शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त वल्लभ शेळके सर,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,सचिव विवेक शेळके,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ कॉलेज ऑफ कॉम्पुटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशालीताई आहेर,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,डॉ. शरद पारखे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वल्लभ शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये खेळाचे महत्व पटवून दिले.
कराटे हा खेळ आत्मसंरक्षणासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असणारा खेळ आहे.
विद्यार्थ्यांनी मोबाईल खेळामध्ये गुंतून न राहता मैदानावरील खेळावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.खेळामध्ये नियमित सराव केला तर यश निश्चित मिळतेच.
या स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्यातील विविध शाळांमधून खेळाडूंनी उस्फुर्त सहभाग नोंदवला.
विजेते स्पर्धक पुढीलप्रमाणे:-
१४ वर्षे वयोगट (मुली)-
३४ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक-गौरी चौधरी
१४ वर्षे वयोगट (मुले)
२५ किलो वजनी गट:-
द्वितीय क्रमांक- गाजरे वीरेंद्र विशाल
३५ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक-उत्कर्ष बेलकर
४० किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक-कार्तिक पुंडे
द्वितीय क्रमांक-शेलार सोहम
४५ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक-प्रणव गाजरे
द्वितीय क्रमांक-मस्के श्रेयस
५० किलो वजनी गट:-
द्वितीय क्रमांक- विहान आल्हाट
१७ वर्षे वयोगट (मुली):-
४४ किलो वजनी गट :-
प्रथम क्रमांक- इशिता किशोर काकडे
१७ वर्षे वयोगट (मुले)
४० किलो वजनी गट :-
द्वितीय क्रमांक- शिरोळे सोहम
४५ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक- साई दिघे
५० किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक- संस्कार शिंदे
१९ वर्षे वयोगट (मुली)
४८ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक- गायत्री मिंडे
५२ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक - श्वेता मटाले
५६ किलो वजनी गट:-
प्रथम क्रमांक- श्रद्धा दिघे
१९ वर्षे वयोगट (मुले):-
४० किलो वजनी गट
प्रथम क्रमांक- आर्यन खिल्लारी
५८ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक- विपुल औटी
८५ किलो वजनी गट
प्रथम क्रमांक- विघ्नेश पवार
स्पर्धेमध्ये पंच म्हणून संदीप गाडे,महेंद्र गुळवे,विजय कंधारे,अनुपम कुंभार,कार्तिक जाधव,अभिजीत टिळेकर यांनी काम पाहिले.
या खेळाडूंना क्रीडा संचालक एच.पी.नरसुडे,सुरेश काकडे,विनायक वऱ्हाडी,राहुल अहिरे यांनी मार्गदर्शन केले.
सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके,ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर,समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे,कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक एच पी नरसुडे यांनी तर आभार सुरेश काकडे यांनी मानले.
