जुन्नर | जुन्नरमधील बोडकेनगर कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्यावरील महावितरणच्या विजेच्या डीपीचे दरवाजे नेहमी उघडलेले असतात, या रस्त्यावर महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच नागरिक मोठया संख्येने येत जातं असतात. हा डीपी रस्त्याच्या कडेला जरी असला तरी येण्या जाण्याचा पदपथ त्याच ठिकानाहून जातो. त्यामुळे साहजिकच विद्यार्थी व लोकं याच ठिकाणाहून वावर करतात.
बरेच दिवसांपासून हा डीपी उघड्या स्वरूपात असून आतील मुख्य फेज तारा उघड्या दिसून येतात, या ठिकाणी लहान मुले सुद्धा बहुतांश वेळा खेळण्यासाठी येतात जातात चुकून एखाद्याचा धक्का लागल्यास फार मोठा अनर्थ घडू शकतो त्यामुळे जुन्नर महावितरण विभागाने या ठिकाणी जाऊन फेज बॉक्स बंद करून त्याची व्यवस्थित उपाय योजना करावी जेणेकरून कुठलीही घटना घडणार नाही.
