प्रतिनिधी : प्रा. अनिल निघोट सर
पन्हाळवाडी येथील नावाजलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडी चे अनेक पुरस्कार विजेते, प्रेरणादायी व्यक्तिमत्व व
उपक्रमशील व आदर्श शिक्षक श्री पोतरे माधव दत्ता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पन्हाळवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव येथील श्री पोतरे सर यांना आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन चा महाराष्ट्र किर्ती पुरस्कार २०२५ सिनेअभिनेत्री हर्षिता ठाकुर, स्नेहा भालेराव व आयोजक आनंदी युनिव्हर्स फाऊंडेशन चे संस्थापक गणेश विटकर या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
त्यामुळे त्यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे!
गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री भट्टी साहेब, केंद्रप्रमुख सन्माननीय श्री कांबळे मिलिंद (दादा ) केंद्राचे विषय शिक्षक श्री तात्यासाहेब हुंबे साहेब व शाळेच्या मुख्याध्यापिका सहकारी भगिनी श्रीमती कोकाटे वनिता ,पालक, ग्रामस्थ, आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.
पुरस्काराबद्दल समाधान व्यक्त करुन श्री माधव पोतरे यांनी ही शैक्षणिक कामाची पावती मिळाल्याची भावना व्यक्त करत पुढील कामासाठी हा पुरस्कार प्रेरणा देत राहील अशा शब्दात शाळेचे ॠण व्यक्त केले.
