प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
आज दि 21 ऑक्टोबर 2025. रोजी दुपारी गोळेगाव आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ झाली. द्राक्ष बागेंची फळ छाटणी सप्टेंबर महिन्यात सुरु झाली असून, ज्या बागा फुटून आल्या आहेत त्या बागांमध्ये काडीवर घड दिसून येत नाहीत. मे महिन्यापासून पडणारा सततचा पाऊस ज्यामुळे वेलील सूर्यप्रकाश न मिळाल्याने घड निर्मिती होऊ शकली नाही. तसेच बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्याने मुळे सडून द्राक्ष वेली अशक्त राहिल्या आहेत .
आतापर्यंत जवळपास 80% छाटण्या पूर्ण झाल्या असून, त्या बागांमध्ये काडीवर घड दिसून येत नाही .काडीवर फक्त वांज फुटच दिसत आहे. त्यामुळे द्राक्ष बगायतदार हवालदिल झाला असून तो खूप मोठ्या संकटात सापडला आहे .
प्रत्येक वर्षी येणाऱ्या नवनवीन संकटामुळे वातावरणतील बदलामुळे मागील काही वर्षी प्रमाणेच यंदाचाही संपूर्ण द्राक्ष हंगाम वाया जाणार असल्याचे चित्र दिसत आहे. त्यात आजच्या पावसाने आजून शेतकऱ्यांचा खर्च वाढवला आहे . आता जरी द्राक्ष वेलिवर माल नसला तरी डावणी,भुरी ,करापा यांसारखे रोग येऊ नये म्हणून विविध बुरशीनाशकांच्या फवारण्या कराव्या लागणार असल्याचे मत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बगायतदार संघांचे संचालक जितेंद्र बिडवई यांनी व्यक्त केले .
