विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय हॅण्डबॉल स्पर्धा २०२५ -२६ डॉ. कदम गुरुकुल स्कूल इंदापूर यांच्या प्रांगणामध्ये दिनांक ७/१०/२०२५ रोजी १४,१७,१९ वर्षाखालील मुले आणि दिनांक ९/ १०/२०२५ रोजी १४,१७, १९ वर्षाखालील मुलींची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉक्टर कदम गुरुकुल स्कूलच्या प्राचार्या डॉ.सविता कदम यांनी अध्यक्षीय स्थानावरून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या उद्घाटन प्रसंगी इंदापूर तालुका क्रीडा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष शरद झोळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मिडीयम स्कूलचे क्रीडा शिक्षक पवार सरांनी केले.या स्पर्धेत श्री शिव छत्रपती महाविद्यालय १९ वर्षाखालील वयोगटात जिल्हा स्तरीय हॅण्डबॉल सर्धेत घवघवीत यश संपादन केले.मुलांच्या अंतिम सामन्यात श्री शिव छत्रपती महाविद्यालयाच्या संघाने डॉक्टर कदम गुरुकुल या संघास १९- ०४ अशा मोठ्या फरकाने परभूत करून अंतिम सामन्यात एकतर्फी विजय मिळवला या विजयात कु उदय शिंदे, कु सोहम केदारी, कु सोहम सरजिने,कु दीपक उतळे,कु नयन मस्करे, कु निरंजन शिंदे,कु जय परदेशी, कु शुभम पारधी, कु श्रीनिवास राठोड इत्यादी खेळाडूंचा विजयामध्ये मोलाचा वाटा आहे.
१९ वर्षाखालील मुलांच्या गटात स्वर्गवासी प्राध्यापक पी.बी कबाडी सर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा फिरता चषक याही वर्षी मिळवत आपल्या कामगिरीत सातत्य राखले आहे.
१९ वर्षाखालील मुलींच्या संघात श्री शिव छत्रपती महाविद्यालयाने हुतात्मा राजगुरू महाविद्यालय राजगुरुनगर या संघास अंतिम सामन्यात १४ - २ अशा मोठ्या फरकाने पराजित केले.या विजयात महाविद्यालयातील कु जयश्री कोकणे,कु आरती परदेशी,कु टीना बोऱ्हाडे, कु रोशनी जाधव,कु निहारिका काळे,कु आकांक्षा काशिद,कु सुवर्णा घुटे,कु सोनल पारधी,कु धनश्री डोके,कु साक्षी पांडे,कु पायल नवले या विद्यार्थिनींच्या बहारदार खेळा मुळे श्री शिव छत्रपती महाविद्यालयांच्या मुलींच्या संघाने राजगुरुनगर महाविद्यालय संघावर अंतिम सामन्यात विजय संपादन केला.श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील १९ वर्षाखालील मुलांचा व मुलींचा दोन्ही संघ अंतिम सामन्यात विजय मिळवून विभागीय स्पर्धेकरता पात्र झाले.संघातील सर्व खेळाडूंचे व जिमखाना विभागाचे जुन्नर तालुका शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड संजय शिवाजीराव काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून अभिनंदन केले.अध्यक्ष प्रतिनिधी प्रा.व्ही.बी.कुलकर्णी,
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.वाघमारे,उपप्राचार्य डॉ.आर.डी.चौधरी,ज्युनिअर महाविद्यालयाच्या समन्वयक व उपप्राचार्या प्रा.पी.एस.लोढा पर्यवेक्षक प्रा.एस.ए.श्रीमंते,एमसीव्हीसी विभाग प्रमुख प्रा.के.जी.नेटके ,वरिष्ठ महाविद्यालय जिमखाना विभाग प्रमुख डॉ.ए.के.बडे ,कनिष्ठ महाविदयालय जिमखाना विभाग प्रमुख प्रा.एम.एस. बोंबले यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

