जुन्नर | जुन्नर तालुक्यातील मौजे बोतार्डे येथील कै. हरिभाऊ पांडुरंग शिंदे जुन्या तमाशातील एक हरहुन्नरी गायक ( सुरत्या ) संपूर्ण महाराष्ट्रात अशा पहाडी आवाजाचा गायक होते, शिंदे हे मोठ्या तमाशात नाव काढलेले व्यक्तिमत्व होते, सोलापूर येथे तमाशा लावणी महोत्सवात त्यांचा त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता, एकदा त्यांना मी विचारलं होतं तेव्हा त्यांनी मला या पुरस्कारावेळी घडलेली हकीकत सांगितली होती, तमाशा सुरू झाला आणि मालती इनामदार गौळण म्हणतं होत्या त्यांच्या तोडीस मी म्हणतं होतो व त्यानंतर कार्यक्रम झाल्यावर तेव्हा गृहमंत्री आर. आर. पाटील माझ्याकडे आले आणि त्यांनी मला शाबासकी दिली व संपूर्ण महाराष्ट्रात असा पहाडी आवाजाचा सुरत्या मिळणार नाही तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं वास्तविक तमाशा ही लोककला आहे व हरिभाऊ शिंदे यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपले जीवन लोक कलेसाठी अर्पण केले असा हा महान कलाकार जुन्नर तालुक्याला लाभला मात्र अजूनही हा कलाकार दुर्लक्षित राहावा ही मोठी शोकांतिका आहे, सन २०१५ मध्ये हरिभाऊ शिंदे हे अनंतात विलीन झाले मात्र त्यांचा तो पहाडी आवाज अजूनही माझ्या कानात घुमतोय अशा या महान कलाकाराला भावपूर्ण आदरांजली 🙏🌹
