आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील नवसाला पावणारी श्री मुकाईदेवी नवरात्रोत्सवाचे २०२५ हे पंचवीसावे रौप्यमहोत्सवी वर्ष असून सकाळ रात्री आरती ,भजन, महिलांची सामुहिक आरती, तरुणाईच्या प्रचंड उत्साह आणि उपस्थितीसह रासदांडिया, पंचक्रोशीतील शेकडो भाविकांची मोठी गर्दी ही या मंडळाची वैशिष्ट्ये आहेत.
देवीच्या प्रतिष्ठापनेचे मानकरी माधवी रामशेठ कर्पे , सुप्रिया आकाश शेटे, संध्या सुमित शेटे,आशिष कुदळे, छाया हितेश शेटे,सुळे बंधु हे होते.प्रमुख उपस्थिती प्रा.सुरेखाताई निघोट शिवसेना जिल्हासमन्वयक, संपर्कप्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र, प्राचार्य अनिल निघोट जिल्हाप्रमुख आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ, अमोल काळे ग्रामपंचायत सदस्य घोडेगाव,खंडु शेटे, विठ्ठल शेटे, संतोष घोडेकर ,मनिषा शेटे,शोभा घोडेकर ,सारिका शेटे,सविता लोहोकरे , राजेश मंदावार, संतोष झोडगे व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उत्तम नियोजन व्यवस्था केली आहे.यावेळी प्रा.सुरेखाताई निघोट यांनी मुकाईदेवीकडे सर्व भाविक भक्तांना उदंड आयुष्य व उत्तम आरोग्य मिळावे अशी प्रार्थना करुन मंडळास शुभेच्छा दिल्या.
