प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर क्रीडा क्षेत्रातसुद्धा सातत्याने उज्ज्वल कामगिरी करून संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या तालुका, जिल्हास्तरीय विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समर्थच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.विविध क्रीडा प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय यश संपादन करून त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
स्पर्धां मध्ये मिळविलेले यश पुढीलप्रमाणे –
गोळाफेक – श्रीराम दांगट : प्रथम क्रमांक.
थाळीफेक – वेदांत घाडगे : तृतीय क्रमांक.
200 मीटर धावणे – प्रणव गाजरे:प्रथम क्रमांक, गणेश परंडवाल : तृतीय क्रमांक.
लांब उडी – प्रणव गाजरे : तृतीय क्रमांक.
तिहेरी उडी – श्रेयस सुकाळे : द्वितीय क्रमांक, रोहन सुकडे : तृतीय क्रमांक.
उंच उडी – पियुष चिकणे : तृतीय क्रमांक.
समर्थ च्या ५ मुलींची मैदानी स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर निवड
गोळा फेक- वैष्णवी गायखे : द्वितीय क्रमांक.
थाळी फेक- वैष्णवी गायखे: द्वितीय क्रमांक.
200 मीटर धावणे- मयुरी दाते : द्वितीय क्रमांक,ईश्वरी दाते : तृतीय क्रमांक.
हार्डल्स110मी.- श्रावणी बाबाजी चौधरी : द्वितीय क्रमांक, समृद्धी शेळके :तृतीय क्रमांक.
हार्डल्स 80 मी.- रिदा आत्तार: द्वितीय क्रमांक.
लांब उडी १४ वर्ष- रिदा आत्तार: तृतीय क्रमांक.
बॉक्सिंग – अमोल घोडे : जिल्हास्तर प्रथम क्रमांक व विभागीय स्पर्धेसाठी निवड
कुस्ती स्पर्धा- सिल्वर मेडल* बापूसाहेब आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र निमगाव केतकी ता. इंदापूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये
विघ्नेश पवार: द्वितीय क्रमांक जीवन बांगर: द्वितीय क्रमांक
या सर्व विद्यार्थ्यांच्या यशामुळे समर्थ गुरुकुल व समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या क्रीडा क्षेत्रातील वर्चस्वाला अधिक बळकटी मिळाली आहे. संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत प्राचार्या, वैशाली आहेर, क्रीडा विभागप्रमुख हरिश्चंद्र नरसुडे, सुरेश काकडे, विनायक वऱ्हाडी,राहुल अहिरे व शिक्षकांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील राज्य व विभागीय स्तरावरील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या.
