Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

समर्थ नर्सिंग कॉलेजमध्ये न्यूट्रिशियन डे (पोषण दिन) उत्साहात साजरा.



प्रतिनिधी : प्रा. प्रविण ताजणे सर

समर्थ रुरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट संचलित,समर्थ नर्सिंग कॉलेजमध्ये(GNM) न्यूट्रिशियन डे मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. १ सप्टेंबर ते ७ सप्टेबर या कालावधीमध्ये संपूर्ण भारतभर जागतिक न्यूट्रिशियन आठवडा साजरा केला जातो याच दिनाचे औचित्य साधून "निरोगी आयुष्यासाठी पोषण मूल्य असलेले पदार्थ खा'" या थीम अंतर्गत समर्थ नर्सिंग कॉलेजमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.



समर्थ शैक्षणिक संकुलाचे सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ नर्सिंग (GNM )कॉलेजच्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ , समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग चे प्राचार्य वैभव सोनवणे, डॉ. शरद पारखे,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके,समर्थ आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे डॉ. रमेश पाडेकर, यशवंत फापाळे,अश्विनी पानमंद उपस्थित होते.



प्राचार्या ऐश्वर्या गटकळ मॅडम यांनी सांगितले की जीवनामध्ये पोषक तत्वांचे (Nutrients) खूप महत्त्व आहे कारण शरीराचे आरोग्य, विकास आणि दैनंदिन क्रिया यासाठी पोषक तत्वांची आवश्यकता असते. प्रत्येक पोषक तत्व शरीराला विशिष्ट कार्य करण्यासाठी मदत करते.पोषक तत्वांचा समतोल आहार घेतल्यास शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, मानसिक व शारीरिक विकास होतो. पोषक तत्वांचा अभाव झाल्यास कुपोषण, थकवा, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे अशा समस्या निर्माण होतात,म्हणून आरोग्यदायी व संतुलित आहार घेणे हेच निरोगी जीवनाचे गमक आहे. 

यावेळी संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले"आज ‘न्यूट्रिशन डे’च्या निमित्ताने. पोषक तत्वांचे महत्त्व विद्यार्थ्यांनी उत्तम पद्धतीने मांडले. संतुलित आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली यावर दिलेला भर समाजासाठीही मार्गदर्शक आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य जागृती नक्कीच वाढेल. मी आयोजक, शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो."

जीवनातील पोषक आहाराचे महत्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी तीन ग्रुप मध्ये स्टॉल लावलेले होते त्यामध्ये.

 *गट अ-:- गरोदरपणातील आहार:-* ज्यामध्ये बीटरूट हलवा, शेंगदाणा चिक्की , राजगिरा लाडू, पालक भाजी आणि नाचणी भाकरी, फळांचा रस, दुध.इ.समावेश आहे.

 *गट ब - व्हिटॅमिन समृद्ध आहार:-* ज्यामध्ये गाजर हलवा, उकडलेले रताळे, दूध यांचा समावेश आहे.

 व्हिटॅमिन B - हिरव्या भाज्यांमध्ये पालक, मेथी, धान्य भाकरी यांचा समावेश आहे.

 व्हिटॅमिन C - आवळा, संत्री, बटाटा आणि टोमॅटो आणि काकडीची कोशिंबीर यांचा समावेश आहे.

 *गट क-किशोरवयीन आहार :-* ज्यामध्ये पालक रोटी,बीट ज्यूस, गाजर हलवा,उपमा, लोहाने समृद्ध आहाराचा समावेश होता.

पोषण समृद्ध पदार्थांच्या पाककला स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी पचन संस्था, हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुस, डोळा यांची प्रतिकृती विविध कडधान्य, तृणधान्य यांच्या माध्यमातून तयार केली होती.

पोषण आहाराचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे स्टॉल लावलेले होते ज्यामध्ये देवयानी गोफणे, पुनम थोरवे, साक्षी आठारी, ऋतुजा शेटे, तनुजा रसाळ, लोमके मोहिनी, साक्षी मोरे, माधुरी गाडेकर, रूपाली हिंगे, वृषाली खुटाळ, आर्या करंडे यांनी आहाराचे योग्य महत्त्व पटवून दिले.

संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके सर, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमाचे खूप कौतुक केले.

कार्यक्रमाचे उत्तम नियोजन समर्थ नर्सिंग कॉलेजच्या हर्षदा गोफने, आयेशा शेख, स्नेहल येवले, सानिया शेख, उज्वला साळवे यांनी केले .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.