पुणे: आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक कृषीराज टकले राष्ट्रीय अध्यक्ष बी. एन.सागर काळे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष रवी प्रताप पटेल , आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष हेमंत सरकार, महिला आघाडी राष्ट्रीय अध्यक्ष कोकीळाताई पवार,पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली
स्वाभिमानी मराठा महासंघ पुणे जिल्हाप्रमुख प्रा. अनिल निघोट यांच्या शिफारशीनुसार सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व मराठा समाजाच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या मराठा सेवकांची विविध पदांवर निवड करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा सरचिटणीस पदावर सामाजिक धार्मिक व बैलगाडा क्षेत्रात अग्रेसर असलेले भवानीमाता घोडेगावचे मुकाईमाता मंडळाचे अध्यक्ष व हरीश्चंद्र देवस्थान चे विश्वस्त खंडुशेठ शेटे ,शिरूर तालुका संघटक म्हणून कान्हुर देसाई चे पत्रकार व माहीती अधिकार कार्यकर्ते दादा खर्डे, आंबेगाव तालुका संघटक म्हणून प्रगतिशील शेतकरी व प्रसिद्ध बैलगाडा मालक विठ्ठल शेठ शेटे, आंबेगाव उपतालुकाप्रमुख कळंब रांजणी गटासाठी संतोष माठे चास तर पेठ घोडेगाव गटासाठी उपतालुकाप्रमुख म्हणून अजित गुंजाळ यांची निवड झाली असुन,
सर्व नवनियुक्त पदाधिकारींचे जिल्हाप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी स्वागत करुन, संघटनेत प्रत्येक गाव,गण,गट, तालुका, जिल्हा, विभाग, राज्य,देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदाधिकारी निवड केली जात असुन ऐतिहासिक आघाडीत मराठा सरदार घराण्यातील वारसांची पदाधिकारी म्हणून निवड होत असुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा,भगव्या झेंड्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी व मराठा आरक्षणाच्या लढाईत एकजुटीची ताकद दाखवण्यासाठी पुणे जिल्हा, आंबेगाव तालुका व गावपातळीवर अध्यक्ष व ईतर पदाधिकारींची मराठा समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी, समाजाच्या अडचणी सोडवुन तातडीने मदत, सहकार्यासाठी नियुक्ती केली जात असुन त्यासाठी मराठा समाजानेही आपल्या समस्यांबाबत 9422463300 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करत तालुक्यात प्रथम मोठ्या गावात शाखा -कार्यालय सुरू करुन मराठा समाजाच्या अडचणी सोडवत, मराठा तरुण तरुणींना भविष्यविषयक मार्गदर्शन ,सोयी सुविधा उपलब्ध करण्याचा व बेरोजगार तरुणांसाठी रोजगार मेळावा आयोजन आणि मराठी संस्कृती, इतिहास जोपासण्यासाठी विविध कार्यक्रम सर्वांचे साथीने केले जाणार असून कोणतेही राजकारण न आणता आपल्या मराठा समाजाच्या हितासाठी,भावी पिढीच्या विकासासाठी एकत्र येत मराठी संस्कृती जोपासण्यासाठी सदैव कार्यरत रहावे असे आवाहन जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट यांनी केले.

