प्रतिनिधी जुन्नर : प्रा. प्रविण ताजणे सर
समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये कंप्यूटर इंजिनिअरिंग विभाग आणि ई-सेल यांच्या संयुक्त विद्यमाने ‘युक्ती इनोव्हेशन आयडियाज २०२५’ ही अभिनव व नाविन्यपूर्ण कल्पनांची स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे तसेच संकुलातील सर्व प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ही स्पर्धा आयआयटी बॉम्बे मार्फत आयोजित नॅशनल एंटरप्रनरशिप चॅलेंज (NEC) उपक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आली होती.त्याअंतर्गत "युरेका पीच कॉम्पिटिशन" ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपापल्या अभिनव कल्पना सादर केल्या.
नवीन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या तसेच ग्रामीण भागातील समस्यांचे निराकरण करणाऱ्या,नाविन्यपूर्ण संकल्पना मांडून दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम फायदेशीर असल्याचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी प्रा.सचिन पोखरकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आलेले होते.ई सेल चे सदस्य रुतुजा गवांदे व त्यांच्या संपूर्ण टीमने उत्कृष्टरीत्या केले.
हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या नवोन्मेषी कल्पनांना प्रोत्साहन देणारा ठरला.
या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या ८७ इनोव्हेटिव्ह आयडिया चे सादरीकरण केले.
क्रिएटिव्ह एआय व्हॉइस रिस्पॉन्सर फॉर सॉर्टिंग आऊट टीनेजर्स स्ट्रेसफुल लाइफ,मॅथ रश,ग्रीन रेवोलुशन यांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा समावेश या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला.
सहभागी विद्यार्थ्यांना शाल,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून डॉ.महेश भास्कर,डॉ.रुस्तुम दराडे,डॉ.शशिकांत ताजने,प्रा.आदिनाथ सातपुते आदींनी काम पाहिले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कॉम्प्युटर इंजिनियरिंग विभागप्रमुख प्रा.स्नेहा शेगर,आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभाग प्रमुख प्रा.शुभम शेळके यांनी विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित शेळके व वैष्णवी गणेश यांनी तर आभार प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी मानले.
