माझे आकाश
गाते ते कधीतरी
मेघा रे मेघा रे
तृष्णा आकांते
ते ओरडणारे....१
ते अंधारलेले
घुमतात वारे
चमकते त्यात
चमचम तारे.....२
वाटते ठेंगणे
पण नसे अंत
झेपेविना वाटे
मनी अति खंत.....३
माझे आकाश
सुरेख देखणे
रिमझिम गाते
खळखळ गाणे.....४
सुरेश शिर्के
खारघर,पनवेल
