Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

कवी यशवंत घोडे फोफसंडीकर यांनी दिल्लीच्या तख्तावर गाजविला काव्य झेंडा.



अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद पुणे- दिल्ली आयोजित ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, दिल्ली-२०२५ चे आयोजन दि २१,२२,२३फेब्रु.२०२५

देशाची राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आले होते.

या संमेलनाची सुरुवात साहित्य ग्रंथदिंडी,चित्ररथ ,कलापथक वाजत गाजत.ढोल ताश्यांच्या गजरात झाली.भारतातील कानाकोपऱ्यातून आलले हजारो मराठी साहित्य रसिक प्रेमी उपस्थित राहून दिल्लीत ७० वर्षांचा इतिहास साहित्यिक व साहित्य यात्रींनी जागा केला.

या संमेलन प्रसंगी उपस्थित 

पंतप्रधान मा . नरेंद्र मोदी हस्ते उद्घाटन झाले, स्वागताध्यक्ष मा.शरद पवार साहेब होते,प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते, संजय नहार,उषा तांबे, रविंद्र शोभणे,संमेलन अध्यक्षस्थानी डॉ.तारा भवाळकर उपस्थित होत्या .

या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुमशेत ता.जुन्नर जि . पुणे येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले व मुळचे अकोले तालुक्यातील अतिदुर्गम निसर्गभूमी फोफसंडी येथील रहिवासी असणारे कवी, लेखक यशवंत मारुती घोडे सर यांची निवड झाली होती.

राजधानीत छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी तालकटोरा स्टेडियम दिल्ली

येथील श्रीमंत सयाजीराजे महाराज गायकवाड सभामंडप व छत्रपती संभाजी महाराज विचार पीठावर यशवंत घोडे सरांनी निसर्गाचे उपासक या काव्यसंग्रहातील स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या बेडकी या बालकवितेचे काव्यवाचन सादरीकरण केले. हास्यमय बालकवितेने उपस्थितांची मने जिंकली .

यशवंत घोडे सरांचे निसर्ग पूजक, निसर्गाचे उपासक साईराजे पब्लिकेशन पुणे संस्थेने प्रकाशित केलले काव्यसंग्रह आहेत.तसेच अवतीभवती या बालकाव्यसंग्रहाची राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन पुणे P MSHRI ग्रंथालय साठी राज्य पातळीवर निवड झाली आहे.तसेच अनेक लेख प्रसिद्ध आहेत.

छत्रपती संभाजी महाराज विचारपीठ कवी कट्यावर 

 अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद चे संस्थापक अभिनेते डॉ.शरद गोरे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सरहद्द संस्थेचे अध्यक्ष संजय नहार ,युवराज नळे डॉ.पोपेरे, संजय आवटे {रामदास मोरे तुकाराम महाराज वंशज] यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी 

जितेंद्र कांबळे सर आळेफाटा, डॉ.विजय पोपेरे अकोले,नितीन पाटील सोलापूर, हेमंत चिकणे,हर्षदा गुळमिरे,सुषमा आलेकर,सुवर्णा तेली,विना होरा, अलका नाईक मुंबई,लक्ष्मण हेंबाडे ,आदेश फुलगे, संदीप तोडकर, तुकाराम जेगोले,माणिकराव गोडसे तुकाराम मोरे, हेमंत बोरसे ,तोरस्कर,सुवर्णा वाघमारे यांच्यासह

समवेत महाराष्ट्र कर्नाटक बेळगाव भागातून आलेल्या निमंत्रित कवी च्या कविता सादर झाल्या .

दि २१ते २३ फेब्रुवारी ग्रंथदिंडी,मुलाखत, परिसंवाद,लोकसाहित्य, कविसंमेलन,कवी कट्टा, एकपात्री नाटृय सादरीकरण झाले . खासदार सुप्रिया ताई सुळे, मा.सुशीलकुमार शिंदे, उपमुख्यमंत्री मा.अजितपवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत ,मा.विजय दर्डा लोकमत वृत्तपत्र 

साहित्य संमेलनासाठी भारतातील असंख्य मराठी साहित्य प्रेमी साहित्य यात्री उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.