Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

heaing logo

heaing logo

मराठा महासंघ शिवभक्तांकडुन शिवजयंतीनिमित्त शिवरायांना अभिवादन!

 


निघोटवाडी दि.१९ फेब्रुवारी 

आज संपूर्ण विश्वातील तमाम हिंदू मायभगीनींचं आराध्यदैवत, जाणता चारित्र्यसंपन्न ,स्वराज्यसंस्थापक ,रयतेचा राजा आणि महाराष्ट्र मराठी माणसांचा मानबिंदू, मराठयांच्या ह्रदयसम्राट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघोटवाडी फाटा बायपास, मंचर येथे राष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघचे संस्थापक डॉ कृषिराज टकले, निलेश धुमाळ याचे मार्गदर्शनाखाली मराठा महासंघ जिल्हाप्रमुख प्रा.अनिल निघोट, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रा.सुरेखाताई निघोट ,सामाजिक कार्यकर्ते संजयशेठ निघोट, प्रशांत बाणखेले, संतोष निघोट, गुंजाळ, प्रभाकर शिंदे, नंदकुमार निघोट, अभिषेक निघोट, कारेगावचे संतोष सणस, चंद्रकांत कराळे,पिंपळगाव चे मंगेश राक्षे,संदेश राक्षे,पिंटु बाणखेले भरत निघोट ,भीमाशंकर मेडिकल कॉलेज चे विद्यार्थी व याशिवाय कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूतुन श्री भीमाशंकर येथे दर्शनासाठी चाललेले शिवभक्तांनीही शिवरायांचा अभिमान व्यक्त करत अभिवादन केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. 

यावेळी प्रा.अनिल निघोट यांनी राजमाता जिजाऊसाहेबांनी रयतेवर प्रेम करायची,व मराठी माती, मराठी माणसं हिंदुसमाजावर अन्याय अत्याचार करणारांस संपूर्ण हिंदुस्थातुन ऊखडण्याची ईच्छा शत्रुंविरूद्ध अनेक युद्ध करुन पुर्ण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त संपुर्ण विश्वात या आदर्श राजाला अभिवादन केले जात आहे, यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत शिवरायांना नमन करून शिवरायंचे पुजन करण्यात आले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.