" पावसाची लीला"
आला आला पाऊस आला
निसर्ग सारा हर्षुनी गेला
मातीचा सुगंध सर्वत्र दरवळला
झाडाझुडपांचा नाच सुरू झाला
शेता शेतात चिखल झाला
डोंगर दऱ्यांशी बोलू लागला
पक्षांचा किलबिलाट झाला
प्राण्यांचा जंगलात सुळसुळाट झाला
मोर थुई थुई नाचू लागला
चातक पक्षी सुखावून गेला
पारिजातकाचा सडा अंगणी पडला
फुलांचा सुगंध आसमंती दरवळला
कोकीळ पक्षी बोलू लागला
शेताच्या बांधांनी ओढा वाहू लागला
बळीराजा सुखावूनी गेला
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता प्रश्न मनी पडू लागला
असा हा वरूण राजा बरसू लागला.
कवयित्री-पल्लवी बाळासाहेब शिंदे.
श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर.
